कडाकरपानेही नुकसान : सुधीर बोरकर यांचे आवाहनगडचिरोली : सप्टेंबर महिन्यात ढगाळ वातावरण असल्याने आद्रतेचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे तुडतुडा, करपा, कडाकरपा या रोगांचा प्रादुर्भाव धानपिकावर झाला आहे. धानपीक शेवटच्या टप्प्यात असल्याने या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करावी, असे आवाहन कीटकशास्त्रज्ञ डॉ. सुधीर बोरकर यांनी केले आहे. हिरवे तुडतुडे, पांढरे तुडतुडे व तपकिरी तुडतुडे असे तीन प्रकार दिसून येतात. तपकिरी तुडतुडे सर्वात जास्त हानीकारक आहेत. तुडतुड्यांमुळे पीक करपून गेले आहेत. अशा रोपांना लोंब येत नाही. लोंब आलेच तर दाणे न भरता पोचट राहतात. या किडीची आर्थिक नुकसानीची पातळी १० तुडतुडी प्रतिचुड असल्याचे आढळून आल्यास मोेनोप्रोटोफास ३६ टक्के प्रवाही १४ मिली किंवा फेनिट्रोथिआॅन ५० टक्के प्रवाहीत १० मिली किंवा मॅलिथिआॅन ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा ट्रायझोेफॉस ४० टक्के प्रवाही २० मिली किंवा फेन्थोएट ५० प्रवाही १० मिली पाण्यात मिसळून फवारावी. करपा रोगाचे लक्षणे दिसल्यास कार्बेंडाझिम १० ग्रॅम किंवा कॉपर आॅक्झिक्लोराईड २५ ग्रॅम यापैकी कोणतेही एक बुरशी नाशक १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. या रोगाच्या प्रादुर्भावास दमटपणा व साधारण उष्ण हवामान कारणीभूत ठरते. शेतकऱ्यांनी हा रोग दिवसातच कॉपर आॅक्झिक्लोराईड २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन १ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात, असे आवाहन डॉ. सुधीर बोरकर यांनी केले आहे.
तुडतुडा रोगावर वेळीच उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 02:16 IST