शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

४०० घे पण युरिया दे!

By admin | Updated: September 13, 2014 23:52 IST

तब्बल एक महिन्याच्या कालावधीनंतर गडचिरोली जिल्ह्याच्या वाट्याला युरिया खताची रॅक आलेली आहे. जिल्ह्यात सध्या २६०० मेट्रिक टन युरिया खत पोहोचला आहे. विलंबाच्या पावसाने अनेक

गडचिरोली : तब्बल एक महिन्याच्या कालावधीनंतर गडचिरोली जिल्ह्याच्या वाट्याला युरिया खताची रॅक आलेली आहे. जिल्ह्यात सध्या २६०० मेट्रिक टन युरिया खत पोहोचला आहे. विलंबाच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी ३० आॅगस्टनंतर धानपिकाची रोवणी केली. त्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने धानपीक आता जमिनीच्यावर डोलू लागले आहे. त्यामुळे धानाला युरिया देण्यासाठी बळीराजा तडफडत आहे. युरियाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा व सर्वात स्वस्त खत असल्याने लहान शेतकरीही युरियाच्या खरेदीसाठी आकांड तांडव करीत आहेत. यासाठी कृषी केंद्र चालक मागेल तेवढे पैसे बॅगसाठी देण्याची त्यांची तयारी आहे, असे काहीसे वास्तव लोकमतने शुक्रवारी दिवसभर केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघड झाले. शेतकरीच जादा पैसे देण्यास तयार असल्याने कृषी केंद्र चालकही अतिशय आनंदी व समाधानी असल्याचे दिसून आले. एकूणच हा शेतकरी व कृषी केंद्र चालकाचा ‘आतबट्ट्यातील व्यवहार’ असल्याचे स्पष्टपणे जाणवले.सहकारी व निमसहकारी संस्था परफेक्टजिल्ह्यात २६०० मेट्रिक टन युरियाचा पुरवठा झाला आहे. कृषी केंद्रांसोबतच विदर्भ मार्केटींग फेडरेशन, विविध सहकारी संस्था, सहकारी भात गिरण्या यांच्या माध्यमातून युरीया खताची विक्री सुरू आहे. या ठिकाणी लोकमतने भेट दिली. तर केवळ ३०० रूपये दराने युरियाची बॅग विकली जात असल्याचे दिसून आले. सायकलवर दोन बॅग टाकून धानोरा रोडकडे जाणाऱ्याही एका शेतकऱ्याला लोकमतने काय भावाने युरिया घेतला, अशी विचारणा केली तर सहकारी भात गिरणीतून ३०० ला एक बॅग घेतली, अशी माहिती त्याने अप्पलवार हॉस्पिटलसमोर बोलताना दिली. तसेच व्हीसीएमएसमध्ये ३०० रूपयाची पावतीसुध्दा दिली जात होती, असे दिसून आले.माडेतुकूम गावात अशी होती परिस्थिती१ वाजून १० मिनिटांनी लोकमतचा प्रतिनिधी चामोर्शी मार्गावरील विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या गोदाम परिसरात युरियाच्या वाहतुकीची माहिती घेण्यासाठी पोहोचला. येथे छायाचित्र घेण्यास सुरूवात केल्यानंतर त्यावेळी तेथे उपस्थित एका शेतकऱ्यांने येथे वाजवी दरात युरियाची विक्री सुरू आहे, अशी माहिती देत जादा भावाने युरीयाची विक्री गडचिरोली तालुक्यातील माडेतुकूम या गावात सुरू आहे, अशी माहिती दिली व लोकमतच्या चमूला घेऊन ते स्वत: माडेतुकूम गावापर्यंत आले. माडेतुकूममध्ये मात्र जोरदार काम सुरू होते. युरीयाची एक बॅग ४०० रूपये दराने विकल्या जात होती. ‘घेशील तर घ्या नाही तर चालते व्हा’ असा सरळ ठोक व्यवहार होता. शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘४०० घे बावा पण युरिया दे’ अशी त्यांची आर्जव विनंती होती. ‘अजी युरिया घ्याच लागते, आता पैशाकडे पाहिल्याने जमत नाही’ असे अनेक शेतकऱ्यांनी लोकमतच्या चमूशी बोलताना सांगितले. त्यानंतर येथूनच लोकमतच्या चमूने जिल्हास्तरावरील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. मात्र शनिवारी कार्यालयात सुटी असल्याने कुणीही उपलब्ध नव्हते व त्यांचे मोबाईलही स्वीचआॅफ होते.