शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

सेंद्रिय शेतीमुळे शेणखताचे दर वधारले

By admin | Updated: May 23, 2015 02:00 IST

रासायनिक खताच्या अतीवापराने बिघडलेला जमिनीचा पोत आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी कृषी विभागाच्या तज्ज्ञांनीकडून मार्गदर्शन मिळत आहे.

७०० ते हजार रूपये ट्राली शेणखत : रासायनिक खताच्या वाढत्या किमतीचा परिणामवैरागड : रासायनिक खताच्या अतीवापराने बिघडलेला जमिनीचा पोत आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी कृषी विभागाच्या तज्ज्ञांनीकडून मार्गदर्शन मिळत आहे. तसेच रासायनिक खताच्या किमती वाढल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळला आहे. परिणामही शेणखताच्या किमतीही वाढल्या आहे. सध्या ग्रामीण भागात ७०० ते हजार रूपये पर्यंत शेण खताच्या एका ट्रालीला शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहे. ग्रामीण भागात पशुपालक शेतकऱ्यांची सख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शेणखतही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. शहरी भागातील तसेच मोठ्या गावातील शेतकरी शेणखतासाठी खेडेगावाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शेणखताच्या किमती वधारल्या आहे. मागील पाच वर्षांत वन हक्काच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे क्षेत्र वाढले. त्यामुळे नव्याने उटविण्यात आलेल्या शेत जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेणखताचा वापर केला जातो. त्यामुळे शेणखताची मागणी वाढली आहे.शेतकऱ्यांना मागणीनुसार रासायनिक खताची उपलब्धतता न होणे तसेच कंपन्या व कृषी सेवा केंद्र संचालकाच्या मनमानीमुळे बांधावार खत योजनेचा फज्जा उडाला. त्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले. त्यामुळे यंदा शेतकरी शेणखत टाकून शेतीची सुपिकता वाढविण्यावर भर देत आहे. त्यामुळे शेणखताचे भाव चांगले वधारले आहे. (वार्ताहर)ंरासायनिक खताचा अपुरा पुरवठाकृषी विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकऱ्यांना अनेकदा गरजेच्या वेळी रासायनिक खत मिळत नाही. मिळाले तरी काळा बाजारामुळे अधिक पैसे मोजावे लागतात. रासायनिक खताच्या वाढत्या किमती धान उत्पादक शेतकऱ्यांना परवडण्यासारख्या नाही.- रामचंद्र क्षीरसागर, शेतकरी वैरागडसेंद्रिय खताचे चांगले फायदेशेणखत, तृणखत वापरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होत आहे. सेंद्रिय खताचे फायचे चांगले आहेत. आम्ही आता रासायनिक खताचा वापर करीत नाही. मागील पाच वर्षात सेंद्रिय खताचे चांगले परिणाम दिसून आले.- महेंद्र तावेडे, शेतकरी तथा अध्यक्ष, सेवा सहकारी संस्था, वैरागड