दुसऱ्या लाटेत काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली. रुग्णांना याेग्य ती माहिती मिळावी तसेच हाेम आयसाेलेशन असलेल्या रुग्णांच्या तब्ब्येतीची विचारणा करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर २३ एप्रिलला स्वतंत्र काेविड हेल्पलाईन सेंटर सुरू करण्यात आले. जिल्हास्तरावरील काेविड हेल्पलाईन सेंटर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या प्रशिक्षण केंद्रात सुरू केले. या ठिकाणी तीन लँडलाईन फाेन व दाेन माेबाईल हाेते. या ठिकाणी डाॅक्टर, आराेग्यसेवक, जि. प. कर्मचारी व तीन शिक्षक असे एकूण सहा कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत राहत हाेते. विविध कारणांसाठी काेविड हेल्पलाईन सेंटरमधील फाेन खणखणत राहत हाेते. आता मात्र रुग्णसंख्या घटल्याने फाेन येणे जवळपास बंद झाले आहे. दाेनच लँडलाईन क्रमांक या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत तर आता केवळ तीनच कर्मचारी कार्यरत आहेत. दिवसातून एखादा फाेन येते. मात्र, या सेंटरमधून दरदिवशी सध्या बाधित रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फाेन केले जातात.
बाॅक्स
ऑक्सिजन बेडसाठी सर्वाधिक काॅल
- काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची सर्वाधिक गरज रुग्णांना भासत हाेती. तालुका स्तरावरील काेविड केअर सेंटरमधून किंवा रुग्णाचे नातेवाईक स्वत: जिल्हा स्तरावरील हेल्पलाईन सेंटरमध्ये फाेन करून ‘सर गडचिराेली जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे काय?’ अशी विचारणा करत हाेते. हेल्पलाईन सेंटरवरील कर्मचारी रुग्णालयात फाेन करून माहिती घेत हाेते. त्यानंतर संबंधित व्यक्तीला कळविले जात हाेते.
- हाेम आसाेलेशनमध्ये असलेल्या रुग्णाला या सेंटरमधून दिवसातून तीनवेळा फाेन केला जात हाेता. त्यामध्ये तब्येतीविषयी विचारणा केली जात हाेती. एखाद्या रुग्णाने तब्येत बिघडल्याचे सांगितल्यास डाॅक्टर त्याला मार्गदर्शन करत हाेते.
- हाेम आयसाेलेशनमध्ये असलेला एखादा रुग्ण गावात फिरत असल्यास त्याची तक्रार या ठिकाणी नागरिक करत हाेते.
- रुग्णालयातील सुविधांबाबत या ठिकाणावरून विचारणा केली जात हाेती.
बाॅक्स
सर कशी आहे तब्बेत? सर नाहीत, मी त्यांचा मुलगा बाेलताे
रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या सेंटरमधून रुग्णांना फाेन केला जात हाेता. दरम्यान, एखादा रुग्ण दगावल्यास त्याचा फाेन त्याचे नातेवाईक उचलत हाेते. सरांचा कालच मृत्यू झाला. मी त्यांचा मुलगा बाेलताे, असे सांगत नातेवाईक टाहाे फाेडत हाेते. हे ऐकून सेंटरमधील कर्मचारी भावूक हाेत हाेते.
बाॅक्स
पूर्वी उपलब्ध फाेन - ५
आता उपलबध फाेन - २
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
१ मे इनकमिंग काॅल - ३७३
१ मे रुग्ण -४७११
१ जून इनकमिंग काॅल-१७७
१ जून रुग्ण-६७५
२१ जून इनकमिंग काॅल-१
२१ जून रुग्ण-२१५