शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

खर्रा व तंबाखू घोटाई जोरात

By admin | Updated: May 13, 2015 01:12 IST

वर्षभरापूर्वी राज्य सरकारने गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थावर महाराष्ट्रात बंदी घातली आहे.

गडचिरोली : वर्षभरापूर्वी राज्य सरकारने गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थावर महाराष्ट्रात बंदी घातली आहे. मध्यंतरीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाचे सचिव असताना महेश झगडे यांनी गडचिरोलीत येऊन सक्त कारवाई करण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले होते. मात्र आता अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तंबाखूजन्य पदार्थ व खर्रा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात राजरोसपणे दररोज सव्वा कोटी रूपयांचा खर्रा विकल्या जात आहे. या खर्ऱ्याचे ग्राहक शाळकरी मुले व महिला व तरूण असल्याने कर्करोगाच्या आजाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र पोलीस व अन्न औषध प्रशासनाला याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर दारू आणली जाते व विकली जाते. त्याच धर्तीवर तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात तस्करी करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस प्रशासनही या संदर्भात कुठलीही कारवाई करीत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने वर्षभरापूर्वी गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र गडचिरोलीत कुठेही ही बंदी असल्याचे दिसून येत नाही. छत्तीसगड व आंध्रप्रदेश राज्याच्या सीमेला लागून जिल्ह्याचे अनेक तालुके आहेत. छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव, पाखांजूर, धानोरा मार्ग गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी केली जात आहे. महाराष्ट्रात गुटखा व तंबाखुजन्य पदार्थावर बंदी नसतांना या मालाचे होलसेल विक्रेते होतेच. शासनाने बंदी घातल्यावरही याच विक्रेत्यांमार्फत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात हा माल राजरोसपणे पोहचविला जात आहे. ठराविक दुकानदार गडचिरोली शहरात अशा मंडळींकडे मालासाठी येरझाऱ्या घालत असल्याचे चित्र आहे.छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यात कुठेही सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थावर बंदी नाही. तेथून कोरची, धानोरा, कुरखेडा आदी भागात माल पाठविला जातो व ग्रामीण भागात तो जुन्याच वितरकांमार्फत पुरवठा केला जातो. त्यामुळे शासनाच्या बंदीला अर्थच उरलेला नाही. उलट शासनाने बंदी केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची कमाई जोमाने वाढली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)जिल्ह्यात खपतो सव्वा कोटींचा खर्रागडचिरोली जिल्ह्यात सुगंधी तंबाखु, सुपारी, चुना यांचे मिश्रण करून तयार करण्यात आलेला एक खर्रा साधारणत: १० ते २० रूपयाला विकल्या जातो. एक पानठेला चालक दिवसाला खर्रा बनविण्यासाठी एक किलो सुपारी वापरतो. एक किलो सुपारीच्या माध्यमातून किमान ५० खर्रे तयार केले जातात. एक पानठेला चालक दिवसाला ५०० रूपयाचे खर्रे विकतो. जिल्ह्यात २५ हजार पानठेले चालक असल्याचे पकडले तर दररोजचीही उलाढाल १ कोटी २५ लाख रूपयावर जाते. संपूर्ण जिल्ह्याच्या खर्रा विक्रीचा हा हिशोब कोटीच्या घरात जातो. याचा अर्थ दररोज जिल्ह्यात सव्वा कोटी रूपयाचा खर्रा नागरिक खातात.सारेच अवैध धंदेवाले पुनर्वसनाची करतात गोष्टराज्यात गुटखा बंदीनंतर गडचिरोली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांनी खर्रा व गुटखा विक्रेत्यांविरोधात धाडसत्र सुरू केले होते. त्यावेळी जिल्ह्यातील पानठेला व्यावसायिकांनी बंद आंदोलन करून मोर्चाही काढला होता. त्यांच्या समर्थनासाठी विविध राजकीय पक्षांची मंडळी पुढे सरसावली होती. आधी पानठेला विक्रेत्यांचे पुनर्वसन करा, अशी मागणी करीत होते. खर्रा, गुटखा या पदार्थांच्या सेवनामुळे तरूण पिढी, लहान मुले, महिला यांचे जबडे उघडणे कठीण झाले आहे. याची राजकीय पुढाऱ्यांना जाण नाही. जिल्ह्यातील अनेक राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधी हे डॉक्टर पदवी घेतलेले आहे. तरीही ते अशा व्यावसायिकांचे राजरोस समर्थन करतात, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.