शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

सहा हजारांवर विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त

By admin | Updated: August 24, 2016 02:10 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली एकात्मिक आदिवासी प्रकल्पाअंतर्गत इयत्ता पहिली

२४ शासकीय आश्रमशाळेतील स्थिती : इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटचा परिणामदिलीप दहेलकर गडचिरोलीराज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली एकात्मिक आदिवासी प्रकल्पाअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय असलेल्या एकूण २४ शासकीय आश्रमशाळांची मंजूर विद्यार्थी प्रवेश क्षमता १३ हजार २५० इतकी आहे. यापैकी यंदाच्या शैक्षणिक सत्रात ६ हजार ८९५ विद्यार्थी प्रवेशित झाले. २४ शासकीय आश्रमशाळांमधील तब्बल ६ हजार ४०५ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त आहेत. इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या कॉन्व्हेंटमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थी पटसंख्येवर मोठा परिणाम होत आहे.गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत कुरखेडा, चामोर्शी, धानोरा, कोरची, गडचिरोली व आरमोरी या सहा तालुक्यांमध्ये एकूण २४ शासकीय आश्रमशाळा आहेत. यामध्ये येंगलखेडा, रेगडी, सावरगाव, मुरूमगाव, गोडलवाही, मार्र्कंडादेव, पोटेगाव, गडचिरोली, पेंढरी, रांगी, भाकरोंडी, कारवाफा, सोडे, रामगड, गॅरापत्ती, पुराणी माल, भाडभिडी, सोनसरी, अंगारा, मसेली, घाटी, कोरची, येरमागड व कोटगूल आदी आश्रमशाळांचा समावेश आहे.शासन निर्णयानुसार शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या कोणत्याही वर्गाची विद्यार्थी प्रवेश क्षमता ५० ठेवण्यात आली आहे. यामध्ये ४० विद्यार्थी हे आश्रमशाळेत निवासी राहणारे व १० बहिस्थ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गडचिरोली प्रकल्पातील २४ शासकीय आश्रमशाळांमध्ये ६ हजार ४२५ मुले व ६ हजार ८२५ मुली असे एकूण १३ हजार २५० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. सन २०१६-१७ या शैक्षणिक सत्रात ५ हजार ९५२ निवासी विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. तर ९४३ बहिस्थ विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात आले आहे. २४ आश्रमशाळांमध्ये एकूण ६ हजार ८९५ विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. ४ हजार ६८८ निवासी व १ हजार ७१७ असे एकूण ६ हजार ४०५ विद्यार्थ्यांचे प्रवेश रिक्त राहिले आहेत. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात ५ हजार २१३, इयत्ता ८ ते १० पर्यंतच्या वर्गात ७५९ विद्यार्थ्यांचे प्रवेश रिक्त आहेत. इयत्ता ११ वी व १२ वीचे कला शाखेचे एकूण १५५ व विज्ञान शाखेचे २७८ विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदाच्या शैैक्षणिक सत्रात रिक्त राहिले आहेत.दुर्गम व ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी राहून शिक्षण घेता यावे, यासाठी राज्याच्या आदिवासी विकास विभागाने गडचिरोली जिल्ह्यात शासकीय आश्रमशाळा सुरू केल्या. सुरुवातीच्या काही वर्षात शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे १०० टक्के प्रवेश पूर्ण होत होते. मात्र गेल्या ५ ते ६ वर्षांपासून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेशाच्या जागा रिक्त राहत आहेत. इंग्रजी माध्यमांचे कॉन्व्हेंट व मोठ्या शाळा गल्लीबोळात सुरू करण्यात आले. याचा परिणाम शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी पटसंख्येवर होत आहे.गडचिरोली प्रकल्प कार्यालयाच्या वतीने सन २०१६-१७ या शैक्षणिक सत्रात गतवर्षीच्या तुलनेत सर्व २४ शासकीय आश्रमशाळा मिळून २०० विद्यार्थी प्रवेशवाढीबाबतचे उद्दिष्ट होते. सदर उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोेनातून आश्रमशाळेचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना वारंवार सूचना देण्यात आल्या. बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. शिक्षकांतर्फे गावभेटी कार्यक्रम राबविण्यात आला. आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती दुर्गम गावांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यामुळे यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची ५७ टक्के उपस्थिती होती. प्रकल्पातील १० आश्रमशाळांमध्ये डिजिटल क्लासरूम करण्यात आली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५० विद्यार्थ्यांचे प्रवेश अधिक झाले आहेत.- विकास राचेलवार, सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोलीइंग्रजी माध्यमाचे पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करणे आवश्यकजिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत चवथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतांश विद्यार्थी पालकांच्या आग्रहाखातर इयत्ता पाचवीत सेमी इंग्लिश अथवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी सर्वच आश्रमशाळेत इंग्रजी माध्यमाचे पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करणे गरजेचे आहे. आश्रमशाळांमध्ये तीन ते साडेतीन वर्ष वयाच्या बालकांपासून इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाची सुविधा झाल्यास आश्रमशाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढण्यास मदत होईल. त्यादृष्टीने राज्याच्या आदिवासी विकास विभागाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.