शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिवकालीन बंधारे ठरू शकतात तालुक्यासाठी वरदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:40 IST

देसाईगंज तालुक्यातील गाढवी नदीच्या किनाऱ्यांवरील अनेक गावांना गाढवी नदीमुळे पाणी पुरवठा होतो.

ठळक मुद्देपाणीटंचाईवर योग्य नियोजन हवे : देसाईगंज तालुक्यात चार ठिकाणी बंधाऱ्यांची गरज

विष्णू दुनेदार/अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी/विसोरा : देसाईगंज तालुक्यातील गाढवी नदीच्या किनाऱ्यावरील अनेक गावांना गाढवी नदीमुळे पाणी पुरवठा होतो. परंतु ही नदी हंगामी स्वरूपाची असल्याने आणि मागील काही वर्षापासून पर्जन्यमानात घट झाल्याने नदीचा प्रवाह फेब्रुवारीच्या शेवटी बंद होऊन ती कोरडी पडते. यावर उपाय म्हणून शिवकालीन बंधारे बांधल्यास उन्हाळ्यातही पाणी मिळणे शक्य होणार आहे.देसाईगंज तालुक्यात उत्तर सीमेतून बोळधा या गावाजवळ गाढवी नदी प्रवेश करून तिथून पुढे बोळधा, कोरेगाव, एकलपूर, चोप, विसोरा, शंकरपूर, तुळशी, कोकडी, किन्हाळा-मोहटोला, डोंगरगाव, झरी-फरी, अरततोंडी या किनाºयालगतच्या गावातील शेतजमिनीला पाणी पुरवते. एकुणच देसाईगंज तालुक्यातील कृषी क्षेत्राला जलपुरवठा करून त्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांना जीवन देणारी ही सरीता तालुक्यासाठी वरदान आहे.गाढवी नदीच्या किनाऱ्याजवळच्या गावातील शालेय विद्यार्थी, ग्रामपंचायत, गावकरी यांच्या श्रमदानातून दरवर्षी वनराई बंधारे बांधतात. त्यामुळे काही प्रमाणात फायदा होतोही, परंतु जर या नदीवर बोळधा कोरेगाव, एकलपूर, तुळशी, अरततोंडी या गावाशेजारी कायमस्वरूपी शिवकालीन बंधारे बांधले तर देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ येणार नाही.शासनाच्या नियमानुसार एखाद्या ठिकाणापासून एक कि.मी. अंतरावरु न पाणी आणावे लागत असेल, तसेच प्रतिदिवशी दरडोई २० लिटरपेक्षा कमी पाणी मिळत असेल तर त्याला पाणी टंचाई म्हणतात. तशी परिस्थिती तालुक्यात कुठेही नाही. परंतु शासन नियमानुसार वर्तमानात असलेल्या सार्वजनिक विहीरी, हातपंप, नळ जलसाठयांपासून पाचशे मीटर अंतरावर ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय दुसरे नवीन जलस्त्रोत खोदण्यास मनाई आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी व आता उपविभागीय अधिकारी यांना जलसाठे संरक्षित करण्याचे अधिकार आहे. दरवर्षी संबंधित अधिकारी जलसाठयांना संरक्षित करतात. परंतु ग्रामपंचायतस्तरावर काही ठिकाणी दुर्लक्ष होते. त्यामुळे अवैध जलउपसा होतो. परिणामी कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. तालुक्यातील जलसाठ्यांवर ग्रामस्तरावरु न योग्य नियंत्रण ठेवल्यास व जलसाठ्यातील गाळ कचरा काढण्याच्या कामाला प्राधान्य दिल्यास पाणी टंचाईला सामना करण्याची परीस्थिती उद्भवू शकणार नाही.गावातील शासकीय हातपंप बिघडल्यास त्या हातपंपांना दुरूस्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून खर्च होणारी हातपंप देखभाल दुरु स्ती योजना कार्यांन्वित आहे. प्रतिहातपंप ग्रामपंचायतला संपूर्ण वर्षासाठी दोन हजार रु पये भरावे लागते. मात्र देसाईगंज पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या १९ ग्रामपंचायतवर हातपंप, वीजपंप आकारणीची रक्कम थकीत असल्याचे दिसते. नाममात्र रकमेचाही भरणा ग्रामपंचायतस्तरावरु न होताना दिसत नाही.भविष्यातील पाण्याचे नियोजन म्हणून गाढवी नदीवर शिवकालीन बंधारे बांधल्यास किनाऱ्याजवळील गावांना निश्चित वरदान ठरेल. यासाठी या भागाच्या लोकप्रतिनीधींनी लक्ष देऊन पुढाकार घेण्याची गरज आहे.नियोजनासाठी गावकऱ्यांचे सहकार्य गरजेचेसद्यस्थितीत देसाईगंज तालुक्यातील ३० महसुली गावे व ६ रिठ लक्षात घेता १४ ठिकाणी नळयोजना असून एका गावातील नळयोजना बंद आहे. १३ ठिकाणी दुहेरी पंपयोजना व दोन ठिकाणी विजपंप सुरु आहेत. देसाईगंज तालुक्याची पाणीपातळी यावर्षी खाली गेली आहे. विहिरी, हातपंप, दुहेरी पंपयोजना व काही गावांसाठी असलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यांची संख्या पाहता यावर्षी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.पाणी हे जीवन आहे, त्याचे महत्व ओळखून पाणीपट्टी कर भरण्यास ग्रामपंचायतला लोकांनी सहकार्य केल्यास, ग्रामपंचायतने जलस्त्रोतांचा उपसा केल्यास, गावांचे हित लक्षात घेत अवैध पाणी उपशावर नियंत्रण ठेवल्यास भविष्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही. त्यासाठी जनजागृती करणेही गरजेचे आहे.