ग्रामपंचायत अंकिसा येथे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी सभा घेण्यात आली. या सभेत विविध विषयांवर चर्चा केली. अंकिसा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ११ जून राेजी ४ कोविड रुग्ण मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शाळा तूर्तास सुरू न करण्याबाबत ठरविण्यात आले. एका महिन्याच्या आत गावात रुग्ण आढळलेले नसावे. तेव्हाच शाळा सुरू करता येतील, असा शासननिर्णय आहे. त्यामुळे सध्या शाळा १२ ऑगस्टपर्यंत सुरू करायची नाही, असे समितीच्या सभेमध्ये ठरविण्यात आले. या वेळी सरपंच सरिता पेद्दी, तलाठी आर.बी. मून, रवींद्रराव व्यासमनेनी, वैद्यकीय अधिकारी डॉ. दादाजी ठाले, ग्रामसेवक प्रकाश भंडावार, मुख्याध्यापक प्रकाश. मांडवे, केंद्रप्रमुख एम. तिजारे, बापू पोटलापेल्ली, संजू पांडवला उपस्थित होते.
140721\2631img-20210714-wa0128.jpg~140721\2631img-20210714-wa0128.jpg
ग्रापंचायत येथे ठरावात शाळा बंद~ग्रापंचायत येथे ठरावात शाळा बंद