लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चामोर्शी तालुक्याच्या अनखोडा येथील अंतर्गत रस्त्यांची पाऊस व चिखलामुळे वाट लागली आहे. परिणामी आवागमन करणारे नागरिक व वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले आहेत.अनखोडा गावातील मुख्य रस्ता कढोली, रामपूर, जयरामपूर, गणपूर या गावाकडे निघतो. मात्र सदर मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. पाणी भरलेल्या या खड्ड्याच्या आकाराचा परिपूर्ण अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारक येथे पडत आहेत. काही जणांचे दुचाकी वाहन सदर चिखलमय रस्त्यात फसत असल्याचे दिसून येत आहे. सदर गावातील नाल्या बुजलेल्या असल्याने नालीतील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. सदर मुख्य रस्त्यावरून वृद्ध नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ दरवर्षी राहते. सदर मार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. मात्र सदर मार्गाच्या पक्क्या दुरूस्तीकडे या विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.आष्टी परिसरातील अनखोडा हे मोठे गाव असून मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे परिसरातील १० ते १२ गावातील लोक अनखोडावरूनच पुढच्या गावाला जातात. विविध कार्यक्रमानिमित्त बरेच लोकप्रतिनिधी या गावात येऊन गेले. त्यांनी गावातील समस्याही पाहिल्या. मात्र या समस्या मार्गी लावण्यासाठी कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. लोकप्रतिनिधींसोबतच प्रशासनाचेही रस्ता दुरूस्ती व इतर विकासात्मक कामांकडे दुर्लक्ष होत आहे.परिणामी पावसाळ्याच्या दिवसात गावातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
अनखोडातील रस्ते बनले चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST
अनखोडा गावातील मुख्य रस्ता कढोली, रामपूर, जयरामपूर, गणपूर या गावाकडे निघतो. मात्र सदर मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. पाणी भरलेल्या या खड्ड्याच्या आकाराचा परिपूर्ण अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारक येथे पडत आहेत.
अनखोडातील रस्ते बनले चिखलमय
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : आवागमनासाठी नागरिक व वाहनधारकांना होताहे त्रास