लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी-खमनचेरू मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. परिणामी सदर मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे.गेल्या दोेन दिवसांपासून अहेरी शहरासह तालुक्यात दमदार पाऊस बरसत आहे. अहेरी शहरातून खमनचेरूकडे जाणाऱ्या रस्त्यावर तहसील कार्यालय, एकलव्य स्कूल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, बीएसएनएल कार्यालय तसेच निमशासकीय कार्यालये आहेत. याशिवाय शाळाही आहेत. त्यामुळे सदर मार्गावर नागरिकांची वर्दळ असते. सदर मार्गावर बीएसएनएल कार्यालयासमोर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास कर्तव्यावर जात असलेल्या एका महिला पोलीस शिपायाचे दुचाकी वाहनाला खड्ड्यामुळे किरकोळ अपघात झाला. पाणी साचून असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. सदर मार्गावर मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सातत्याने मागणी करूनही या मार्गाची दुरूस्ती करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अहेरी नगर पंचायतीने येथे मुरूम टाकावा, अशी मागणी आहे.
अहेरी शहरातील मार्ग खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST
गेल्या दोेन दिवसांपासून अहेरी शहरासह तालुक्यात दमदार पाऊस बरसत आहे. अहेरी शहरातून खमनचेरूकडे जाणाऱ्या रस्त्यावर तहसील कार्यालय, एकलव्य स्कूल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, बीएसएनएल कार्यालय तसेच निमशासकीय कार्यालये आहेत. याशिवाय शाळाही आहेत.
अहेरी शहरातील मार्ग खड्ड्यात
ठळक मुद्देअपघाताची शक्यता बळावली : खमनचेरूकडे जाणारा रस्ता वर्दळीचा