शिवणी येथे माळी समाज प्रबोधन मेळावा : ४० उपवर-वधूंनी दिला परिचय; मान्यवरांचा सूरंंगडचिरोली : माळी समाजात अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा वाढत आहेत. अंधश्रद्धेत समाज आकंठ बुडत असल्याचे घटनांवरून दृष्टीस पडते. माळी समाजाला अंधश्रद्धेपासून परावृत्त करण्यासाठी महात्मा फुले यांच्या विचारसरणीची गरज आहे. महात्मा फुले यांच्या विचारांनीच माळी समाजाची प्रगती शक्य आहे, असा सूर मान्यवरांनी काढला. शिवणी येथे माळी समाज प्रबोधन मेळावा व उपवर- वधू परिचय मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकला महाडोळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पुरूषोत्तम निकोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून दिलीप कोटरंगे, अखिल भारतीय माळी महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र महाडोळे हजर होते. मंचावर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. पी. लांबे, गुणाबाई गुरनुले, नानाजी वाढई, प्रा. मोहुर्ले, अहेरीच्या पं. स. सदस्य सरिता वाडगुरे, इंदिरा मोहुर्ले, माया मोहुर्ले, भैयाजी वाढई, अॅड. भोजराज वसाके, प्रा. राम गुरनुले, वासुदेव मोहुर्ले उपस्थित होते. मेळाव्यात एकूण ४० उपवर- वधूंनी परिचय दिला. स्त्रियांनी मुलांवर योग्य संस्कार करून वाईट चालिरीतींपासून मुलांना दूर ठेवावे, शक्यतो मेळाव्यांमध्ये मुलामुलींचे लग्न करून पैसा व वेळेची बचत करावी, असे आवाहन चंद्रकला महाडोळे यांनी केले. विज्ञानाची कास धरल्याशिवाय माळी समाजाची प्रगती अशक्य आहे, असे प्रतिपादन पुरूषोत्तम निकोडे यांनी मेळाव्यात केले. ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची आवश्यकता का आहे? याबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत ओबीसी संघटनांनी पुकारलेल्या कोणत्याही उपक्रमात माळी समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन दिलीप कोटरंगे यांनी समाज बांधवाना यावेळी केले. माळी समाजातील सर्व पोटजातींनी एकत्र येऊन समाज एकसंघ करावा, तसेच समाजाने शिक्षणाची कास धरावी, असे आवाहन राजेंद्र महाडोळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजसंघटनेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अशोक मांदाळे, संजय लेनगुरे तर आभार रमेश जेंगठे यांनी मानले. यशस्वीतेसाठी घनश्याम गुरनुले, दत्तू चौधरी, योगेश सोनुले, नीलकंठ निकुरे, हरिदास कोटरंगे, लक्ष्मण मोहुर्ले, शंकर चौधरी, शंकर गुरनुले, रेवतीनाथ कावळे, नरेंद्र निकोडे, देवराव मोहुर्ले, पुरण पेटकुले, देवेंद्र लोनबले, अरूण चौधरी, रमेश मोहुर्ले, युवराज मांदाळे, वसंत गावतुरे, भाष्कर जेंगठे, नामदेव गुरनुले, दीपक गावतुरे, संतोष चौधरी यांनी सहकार्य केले. मेळाव्यानंतर रात्री ‘ज्योती सावित्रींची’ कार्यक्रम धानोरा येथील पथकाने सादर केला. मेळाव्यात गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो माळी समाजबांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
फुलेंच्या विचारांनीच समाजाची प्रगती
By admin | Updated: January 12, 2016 01:20 IST