गडचिरोली : विश्व हिंदू परिषद जिल्हा गडचिरोलीच्यावतीने सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त २८ डिसेंबर रोजी रविवारला गडचिरोली येथील अयोध्यानगरात विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाची तयारी जोरदार सुरू असून या संमेलनाला अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुर्जी येथील जितेंद्रनाथ महाराज मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी १२ ते ४ या वेळेत हे संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या तयारीसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये व चंद्रपूर विभागाचे पदाधिकारी प्रा. डॉ. सुरेश परसावार आदींच्या मार्गदर्शनात तयारी सुरू करण्यात आली आहे. या संमेलनाला विहिंप विदर्भ प्रांत सहमंत्री सनद गुप्ता, पराग दवंडे, प्रकाश पोरेड्डीवार, डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. राजाभाऊ मुनघाटे, भाग्यवानजी खोब्रागडे, गजाननराव भांडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने २०१४-१५ हे वर्ष सुवर्ण जयंती महोत्सव वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यावर्षात विश्वहिंदू परिषदेच्यावतीने गोरक्षण, रक्तदान शिबिर व अन्य सामाजिक उपक्रम घेण्यात आले. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने हिंदू हेल्प लाईन सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
हिंदू संमेलनाची जय्यत तयारी सुरू
By admin | Updated: December 27, 2014 01:38 IST