चामोर्शीतील मुख्य राष्ट्रीय महामार्गापासून हनुमाननगरकडे जाणारा बायपास रस्ता राईस मिलपासून घोट काॅर्नरपर्यंत रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर उखडून गिट्टी व मुरूम बाहेर पडले आहे. सदर मार्गावर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकी, चारचाकी वाहनधारक, शेतीकडे जाणारे नागरिक तसेच पायदळ जाणाऱ्यांना त्रास हाेत आहे. शिवाय या मार्गावर मोठ्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. याच बायपास मार्गावर राईस मिल, पोस्ट ऑफिस, आश्रमशाळा, नर्सिंग कॉलेज, भूमिअभिलेख कार्यालय, उपविभागीय अधिकारी (राजस्व) कार्यालय, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय, सेतू केेंद्र, दुकाने आहेत. त्यामुळे अनेक नागरिक कामानिमित्त दुचाकी, चारचाकी व पायदळ येत असतात. यासाठी सदर मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
===Photopath===
200621\img_20210620_110432.jpg
===Caption===
चामोर्शी तील हनुमान नगर ते घोटी कॉर्नर जाणाऱ्या रस्त्याची झाली वाट खडतर फोटो