यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ६८ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाणार आहे.
धान राेवणी करण्यासाठी ११ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पऱ्हे टाकण्यात आले आहे. राेवणीच्या कामाला सुरुवात करण्यासाठी माेठ्या पावसाची गरज भासते. मात्र अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे शेत सखल भागात तसेच ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे अशानीच राेवणीला सुरुवात केली आहे. त्यामुळेच केवळ सहा हजार हेक्टर क्षेत्रावर धानाच्या राेवणीची कामे आटाेपली आहेत.
(बाॅक्स)
१५ हजार ७९१ हेक्टरवर आवत्या
धान राेवणीचा खर्च वाचविण्यासाठी काही शेतकरी आवत्या पद्धतीने धानाची राेवणी करतात. यावर्षी सुमारे १५ हजार ७९१ हेक्टर क्षेत्रावर आवत्या पद्धतीने धानाची लागवड करण्यात आली आहे. आवत्या बराेबरच काही शेतकऱ्यांनी यावर्षीपासून धानाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. गडचिराेली तालुक्यात ३ हजार २६९, कुरखेडा ४७६, आरमाेरी ४ हजार १०४, चामाेर्शी ५५३, धानाेरा ३ हजार ८९, काेरची १ हजार, देसाईगंज १ हजार २१७, मुलचेरा १५९, भामरागड ३९८ हेक्टर क्षेत्रावर आवत्याची लागवड करण्यात आली आहे.
(बाॅक्स)
सिराेंचा तालुक्यात पऱ्हे भरण्यास सुरुवात
सिराेंचा तालुक्यात यावर्षी उशिरा पाऊस झाला. आता शेतकरी पऱ्हे टाकत आहेत. त्यामुळे धान राेवणीच्या कामाला सुरुवात हाेण्यास पुन्हा १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या तालुक्यात कापसाचे माेठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकरी कापसाच्या लागवडीत व्यस्त असल्याचे दिसून येतात. कापसाची लागवड झाल्यानंतर शेतकरी धान पिकाकडे वळतात.
(बाॅक्स)
तालुकानिहाय धानाचे क्षेत्र व राेवणी
तालुका क्षेत्र राेवणी
गडचिराेली १८,८२५ २१२६
कुरखेडा १५,६८० ४३४
आरमाेरी १८,८७३ १४८२
चामाेर्शी २७,००० ३८५
सिराेंचा ७७०४ २५
अहेरी ११,५१० ७२
एटापल्ली १३,८०५ ४९
धानाेरा १९,८०४ ६८
काेरची १०,५१९ १३७
देसाईगंज ११,००४ १००२
मुलचेरा ६०५३ १६५
भामरागड ७६४० १७
एकूण १,६८,४२० ५९६२