शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
4
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
5
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
6
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
7
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
8
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
9
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
10
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
11
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
12
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
13
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
14
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
15
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
16
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
17
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
18
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
19
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
20
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स

पेसा अधिसूचनेत बदल शक्यच नाही; काँग्रेस-भाजपचे केवळ राजकारण

By admin | Updated: August 23, 2015 01:54 IST

९ जून २०१४ मध्ये राज्यपालांनी अध्यादेश काढून पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

आदिवासी नेत्यांवर रोष : निवडणुकीच्या तोंडावर आंदोलनगडचिरोली : ९ जून २०१४ मध्ये राज्यपालांनी अध्यादेश काढून पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महाराष्ट्रात ११ जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू झाला आहे. हा कायदा लागू झाल्यामुळे आदिवासी व गैरआदिवासी या दोन समुदायांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. काँग्रेस व भाजप या मुद्यावरून आळीपाळीने आंदोलन करून गैरआदिवासींना दिशाभूल करण्याचे काम करीत आहे. पेसा अधिसूचनेत बदल होऊ शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. त्यामुळे केवळ नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर गैरआदिवासींना आम्ही तुमचे कैवारी आहे, हे दाखविण्यासाठी हा सारा खटाटोप चाललेला आहे. यापूर्वी भाजपच्या छत्रछायेत असलेल्या ओबीसी नेत्यांनीही विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या आधी असाच खटाटोप केला होता. त्यावेळी भाजपचे नेते काँग्रेस आमदारांवर टीका करीत होते. तर आता काँग्रेस आमदार भाजप लोकप्रतिनिधींवर टीका करीत आहे. हा केवळ मनोरंजनाचा खेळ असल्याचे सर्वसामान्यांमध्ये बोलले जात आहे.भारताच्या राष्ट्रपतींनी १९८५ मध्ये जी अधिसूचना जाहीर केली. त्याप्रमाणे हे क्षेत्र देण्यात आलेले आहे. राज्याचा व देशाचा विचार करता एकट्या गडचिरोली जिल्ह्यासाठी कायद्याच्या अधिसूचनेत बदल करता येत नाही, ही बाब काँग्रेसची महाराष्ट्रात सत्ता असतानाही स्पष्ट करण्यात आली होती. या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी त्यावेळी अत्यंत आग्रही भूमिका घेऊन होते. पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दिलेल्या निवेदनावर महाराष्ट्रातील अनेक अनुसूचित जमाती प्रवर्ग क्षेत्रातून निवडून आलेल्या तत्कालीन आमदारांच्या स्वाक्षऱ्याही होत्या. यावरून त्यांची आग्रही भूमिका स्पष्ट होते. त्यामुळे या मुद्यावर आघाडी सरकारची सत्ता असताना भाजपने काँग्रेसवर आगपाखड करून आपली राजकीय पोळी शेकली. आता भाजप सत्तेवर आहे. काँग्रेसही तशीच भूमिका घेऊन आहे. काँग्रेसच्या आदिवासी नेत्यांनी याबाबत पेसा लागू करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता, गैरआदिवासींचा विकास करावा, असा सध्या काँग्रेसचा कार्यक्रम आहे. अशा दुहेरी हेतूतून हे शक्य होणार नाही. त्यामुळे भाजप-काँग्रेस पेसाचा आधार घेत या जिल्ह्यातील गैरआदिवासी लोकांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळेच मागील निवडणुकीत नोटांचे मतदान वाढले. ही परिस्थिती पुन्हा निर्माण झाली पाहिजे, अशी भूमिका घेऊन आंदोलनाला धार देण्याची भूमिका घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात तरी पेसा अधिसूचनेत बदल होणे शक्य नाही, असे मत अनेक आदिवासी संशोधक, अभ्यासक तसेच उच्च विद्याविभूषित मान्यवरांनी व्यक्त केले आहे. ज्या गावात आदिवासींपेक्षा गैरआदिवासींची संख्या अधिक आहे, त्यांनी ग्रामसभेत ठराव घेऊन यात बदल करण्याबाबत मागणी करता येऊ शकते. हाच एक पर्याय दिसून येत आहे. राज्यपालांनाही राष्ट्रपती महोदयांचे पेसा कायद्याच्या अंमलबजावणीबाबत कठोर व कडक निर्देश आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कामही सुरू झाल्याचे दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)देशात नऊ राज्यात १०२ जिल्ह्यात अंमलबजावणीभारतीय संविधानाच्या सहाव्या सूचीमध्ये मिझोरम, त्रिपुरा, मेघालय आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या राज्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीमध्ये देशातील एकूण नऊ राज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पंचायत क्षेत्र विस्तार कायदा १९९६ अंतर्गत देशातील एकूण नऊ राज्य आहेत. त्यापैकी महाराष्ट्र एक राज्य आहे. या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश (८ जिल्हे), छत्तीसगड (७ जिल्हे), गुजरात (८ जिल्हे), हिमाचल प्रदेश (३ जिल्हे), झारखंड (९ जिल्हे), मध्य प्रदेश (१४ जिल्हे), महाराष्ट्र (११ जिल्हे), राजस्थान (५ जिल्हे), ओरिसा (१० जिल्हे) यांचा समावेश आहे. भुरिया अभ्यास समितीने केल्या होत्या शिफारशीकेंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने खा. दिलीपसिंग भुरिया यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठित केली होती. या समितीने ग्रामसभेला कायदेशिर अधिष्ठान प्राप्त व्हावे व तिच्या अधिकाराखाली आदिवासी विकासाचे निर्णय घ्यावेत, आदिवासींची जमीन व जंगलातील हक्क मान्य करण्यात यावा आदी शिफारशी केल्या होत्या. या शिफारशीच्या आधारे केंद्र शासनाने २४ डिसेंबर १९९६ ला पंचायत क्षेत्र विस्तार कायदा पारित झाला.