कुरखेडा येथील श्री. गो. ना. मुनघाटे महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाद्वारे बुधवारी ‘कोरोना संकटाचा समाजशास्त्रीय अध्ययन’ या विषयावर आभासी पद्धतीने एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. परिषदेत मार्गदर्शक म्हणून लखनौ विद्यापीठाचे समाजशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. डी.आर. साहू, मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. नारायण कांबळे, सागर विद्यापीठाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिवाकर राजपूत आदी सहभागी झाले.
प्रास्ताविक विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. बी.एम कराडे, संचालन प्रा. डॉ. रवींद्र विखार, प्रा. डॉ. गोपी निंबार्ते तर आभार प्रा. डॉ. दशरथ आदे यांनी मानले. आभासी परिषदेत डॉ. स्निग्धा कांबळे, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, डॉ. प्रीती काळे, प्रा संजय चव्हाण, प्रा. कोंडावार, प्रा. डॉ. गजेंद्र कढव, विनय हातोळे तसेच सर्व विदर्भ समाजशास्त्र परिषदेचे कार्यकारिणी सदस्य, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक सहभागी झाले.