लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याचे दुसरे मुख्यमंत्री स्व. मा. सा. कन्नमवार यांची जयंती जिल्ह्यात ठिकठिकाणी बुधवारी साजरी करण्यात आली.मार्र्कंडादेव : मा.सा. कन्नमवार यांची जयंती साजरी करण्यात आली. मार्र्कंडादेव येथील मा.सा. कन्नमवार यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच उज्ज्वला हेजीब, पोलीस पाटील आरती आभारे, ग्रा.पं. सदस्य भुजंग प्रकाश, सुधाकर उईके, मनोज हेजीब, रामू गायकवाड, अनंत गायकवाड, गजेंद्र दाडमवार, विनोद पेशेट्टीवार, मंगेश पल्लीवार, दीपक रेड्डीवार, प्रा. संतोष सुरपाम व नागरिक उपस्थित होते.आष्टी : येनापूर येथे मा.सा. कन्नमवार यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला माजी सरपंच निलकंठ निखाडे, सेवानिवृत्त वनपाल गंगाधर पल्लीवार, माजी पं.स. उपसभापती मनमोहन बंडावार, मोरेश्वर येडलावार, दिलीप पुप्पलवार, सुरेश गुंतीवार, साईनाथ येडलावार, प्रतिभा विनोद बर्लावार, पेदू पेशट्टीवार, श्रीहरी गोपवार, नामदेव गोपवार, किशोर गोपवार, दिलीप ताटकलवार, गुलाब गड्डलवार, राजू बर्लावार तसेच बेलदार समाज बांधव उपस्थित होते.आलापल्ली : येथील श्रीराम मंदिरात कापेवार, बेलदार समाजातर्फे मा.सा. कन्नमवार यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शंकरराव गाजलवार, किष्टय्या उप्पलवार, नगराध्यक्ष प्राजक्ता पेद्दापल्लीवार, भैय्याजी पुद्दटवार, नारायण कासेट्टीवार, नामदेव रालबंडीवार, रमेश तर्रेवार, भिमय्या साईनवार, मंगेश परसावार उपस्थित होते. समाजातील वंचित घटकांना सोबत घेऊन विकास साधण्याचा संदेश मा.सा. कन्नमवार यांनी समाजाला दिला, असे प्रतिपादन शंकरराव गाजलवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहा कासेट्टीवार तर आभार श्रध्दा येडलावार यांनी मानले. यशस्वीतेसाठी मुक्ता येडलावार, छाया नामनवार, शोभा कासेट्टीवार, मंजुषा राजनलवार, सूचित येडलावार, राहूल मुपीडवार, आकाश लेडीवार, व्यंकटेश राजनलवार यांनी सहकार्य केले.चामोर्शी : बेलदार-कापेवार समाज सेवाभावी संस्थेतर्फे मा.सा. कन्नमवार यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला हेमंत आकुलवार, बोडावार, साईनाथ पेशेट्टीवार, साईनाथ मंदावार, विठ्ठल चंदावार, लक्ष्मीबाई चलकलवार, प्रमोद येडलावार, डाू. नरेंद्र पत्तीवार, ओंकार पेशेट्टीवार उपस्थित होते. अल्पोपहार वाटप करण्यात आला. संचालन काजल जटांगलवार तर आभार सचिन चलकलवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश चलकलवार, अभय पुठ्ठावार, सतिश दासरवार, राहूल चरकलवार, संतोष गोपावार, रवी सिंधेकीवार, विजय कंबालवार, उमेश चिलके, मनोहर पेशेट्टीवार यांच्यासह समाज बांधवांनी सहकार्य केले.
मा.सा. कन्नमवार जंयती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:35 IST
राज्याचे दुसरे मुख्यमंत्री स्व. मा. सा. कन्नमवार यांची जयंती जिल्ह्यात ठिकठिकाणी बुधवारी साजरी करण्यात आली. मार्र्कंडादेव : मा.सा. कन्नमवार यांची जयंती साजरी करण्यात आली. मार्र्कंडादेव येथील मा.सा. कन्नमवार यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
मा.सा. कन्नमवार जंयती साजरी
ठळक मुद्देविविध कार्यक्रम : बेलदार-कापेवार समाजाचा पुढाकार