शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

शेतकऱ्यांना दिले आधुनिक शेतीचे धडे

By admin | Updated: December 23, 2014 23:04 IST

औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि मसाला विकास निर्देशालय कालिकत, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे

गडचिरोली : औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि मसाला विकास निर्देशालय कालिकत, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासोबतच मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणाचे उद्घाटन गडचिरोली वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अनबतुला यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. पी. लांबे होते. प्रमुख अतिथी म्हणून सहायोगी अधिष्ठाता डॉ. पी. आर. कडू, आत्माचे प्रकल्प अधिकारी अनंत पोटे, औषधी वनस्पती प्रकल्प प्रमुख डॉ. विजू अमोलीक, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. शशिकांत चौधरी, प्रा. योगिता सानप, दत्तात्रय सोनवने, डॉ. अनोकार, डॉ. नेहारकर, देवराव ठाकरे, जितेंद्र कस्तूरे, भैसारे, प्रमोद भांडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात डॉ. पंजाबराव देशमुख, धन्वंतरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. जिल्ह्यात वनविभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या वनौषधीसंबंधी प्रकल्पाची माहिती तसेच वनविभागाच्या योजनांची माहिती श्रीलक्ष्मी अनबतुला यांनी दिली. विविध विभागांनी आपले ज्ञान व तंत्रज्ञानासह हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. एस. पी. लांबे यांनी राहूरी कृषी विद्यापीठाच्या चमूचे कौतूक केले. तसेच शेतीविषयक माहितीची देवाणघेवाण गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात करणे ही एक संधी आहे, असे प्रतिपादन केले. पहिल्या सत्रात सुगंधी वनस्पती लागवड, प्रक्रिया याबाबत डॉ. अमोलीक तर दुर्मिळ वनस्पतीबाबत डॉ. शशिकांत चौधरी यांनी माहिती दिली. (शहर प्रतिनिधी)