लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त सोयीसुविधांचा अभाव व इतर विविध समस्यांवर आक्रमक होत तालुक्यातील कनेली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला ग्रामसभेचे सदस्य व इतर ग्रामस्थांनी शुक्रवारी कुलूप ठोकले.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सदर उपकेंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली नाही. तसेच आरोग्य सेवकही मुख्यालयी राहून सेवा देत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना जिल्हा तसेच तालुका मुख्यालयाच्या रूग्णालयात औषधोपचारासाठी जावे लागते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी शासनाने कनेली येथे आरोग्य उपकेंद्राची निर्मिती केली. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे या आरोग्य उपकेंद्राची सेवा पूर्णत: ढासळली आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.सदर उपकेंद्रात कर्मचारी नसल्याने औषधोपचाराविना रूग्णांना घरी परतावे लागते. या उपकेंद्राच्या विविध समस्यासंदर्भात कनेली, मुरचुल, आलकनार, चुटींगटोला आदी ग्रामसभेने प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊन समस्या अवगत केली होती. मात्र प्रशासनाच्या वतीने कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कनेलीवासीयांनी शुक्रवारला आरोग्य उपकेंद्रास कुलूप ठोकले. येथील रिक्त पदे भरून आरोग्य सेवा सुरळीत करण्याची मागणी ग्रामसभा सदस्यांनी केली आहे.
आरोग्य उपकेंद्राला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:50 IST
डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त सोयीसुविधांचा अभाव व इतर विविध समस्यांवर आक्रमक होत तालुक्यातील कनेली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला ग्रामसभेचे सदस्य व इतर ग्रामस्थांनी शुक्रवारी कुलूप ठोकले.
आरोग्य उपकेंद्राला ठोकले कुलूप
ठळक मुद्देरिक्त पदे भरा : ग्रामसभा सदस्यांसह कनेलीवासीयांची मागणी