शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कामांची गती वाढवा

By admin | Updated: April 14, 2017 01:20 IST

शेतीची सिंचन क्षमता वाढविण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवारची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत.

आमदारांचे निर्देश : जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा घेतला आढावाकुरखेडा : शेतीची सिंचन क्षमता वाढविण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवारची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने या प्रकल्पाला कधीच निधीची कमतरता भासणार नाही. जलयुक्त शिवारच्या कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले. राज्य शासनाच्या निर्देशासनुसार आ. क्रिष्णा गजबे यांनी कुरखेडा पंचायत समितीमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला एसडीओ शुभांगी आंधळे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी भुजबळ, पंचायत समिती सभापती गिरीधारी तितराम, तहसीलदार अजय चरडे, तालुका कृषी अधिकारी खंडाळे, जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, नाजूक पुराम, संवर्ग विकास अधिकारी मरस्कोल्हे, विलास गावंडे, रवींद्र गोटेफोडे, रामहरी उगले, उल्हास देशमुख, वनपरिक्षेत्राधिकारी, बँक व्यवस्थापक उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानावर राज्य शासनाने शेकडो कोटी रूपये खर्च केले आहेत. मात्र काही जिल्ह्यांमधील कामे नियोजनाअभावी ठप्प पडली असल्याचे शासनाच्या लक्षात आले. या कामांना गती देण्याच्या उद्देशाने प्रत्येक आमदाराने आपल्या क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी तालुक्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. काही गावांनी अजूनही कामे सुरू केली नसल्याचे दिसून आले. तर काही गावांमधील नागरिकांनी योग्य नियोजन केल्याने तेथील कामे पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहेत. जी कामे हाती घेण्यात आली आहेत ती कामे पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश आ. क्रिष्णा गजबे यांनी अधिकाऱ्यांना दिले. कामे करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास सदर बाब आपल्या लक्षात आणून द्यावी, ती अडचण सोडविण्यासाठी आपण शासनाकडे प्रयत्न करू, असे मार्गदर्शन केले. वीज व पाणी समस्येवर केली चर्चाउन्हाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात वीज व पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदारांनी कुरखेडा येथील विश्रामगृहात तालुक्यातील वीज व पाणी समस्येचा आढावा घेतला. यावेळीसुद्धा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पाणीटंचाईची समस्या गंभीर होऊ नये, यासाठी ज्या गावातील हातपंप बंद आहेत, तेथील हातपंप तत्काळ दुरूस्त करावे, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.