गडचिरोली : अमिर्झा परिसरातील हातपंप मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. हा हातपंप दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे, मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या हातपंपाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
झिंगानूर येथे विद्युत उपकेंद्र निर्माण करा
झिंगानूर : येथे विद्युत उपकेंद्र निर्माण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. झिंगानूरपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या बामणी येथून वीजपुरवठा या परिसरात केला जात आहे. दूरवरून वीजपुरवठा होत असताे.
प्रसूतिगृहात सुविधा द्या
आरमोरी : जिल्ह्यातील ३७६ आरोग्य केंद्रांपैकी ३५४ उपकेंद्रांमध्ये प्रसूतिगृह बांधण्यात आले आहे. मात्र सदर प्रसूतिगृह अत्यंत लहान असून, या प्रसूतिगृहांमध्ये आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांचा अभाव असल्याने गरोदर मातांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे प्रसूतिगृहांत सुविधा द्याव्या.
अनेक भूखंड रिकामे
गडचिरोली : शहराजवळ शेकडो एकर जागा असून, एमआयडीसीसाठी राखीव करण्यात आली आहे. या परिसरात पाणी, वीज यासारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र बहुतांश भूखंड रिकामेच आहेत. उद्याेग उभारल्यास बेराेजगारांना राेजगार मिळू शकताे. यासाठी पुढाकार आवश्यक आहे.
रानवाही मार्ग खड्ड्यात
धानोरा : तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या चव्हेला ग्रामपंचायतीमधील रानवाही या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. चव्हेला-रानवाही या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने या भागातील वाहनधारक व प्रवाशांची प्रचंड पंचाईत होत आहे. त्यामुळे मार्गाची दुरुस्ती करावी.