लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रा भरणार आहे. सदर यात्रेत व्यावसायिक व भाविकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर करू नये, जेणेकरून स्फोट होणार नाही असा ठराव सर्वानुमते यात्रा नियोजन सभेत पारित करण्यात आला.तालुक्यातील मार्र्कंडादेव व चपराळा देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून भरणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर नियोजन सभा उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयीन कक्षात मंगळवारी पार पडली.या सभेला तहसीलदार अरूण येरचे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड, संवर्ग विकास अधिकारी खामकर, उपविभागीय अभियंता एस. एम. उरकुडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हेमके, नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, पोलीस उपनिरिक्षक मल्लार थोरात, मार्र्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, चपराळा देवस्थानचे अध्यक्ष डॉ. पी. एम. पंदिलवार, सचिव वि. कृ. शारसे आदी उपस्थित होते. या सभेत यात्रेत भाविकांना विविध विभागामार्फत पुरविण्यात येणाºया अनेक सेवांचा आढावा घेण्यात आला.
गॅस सिलिंडरचा वापर होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:40 IST
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रा भरणार आहे. सदर यात्रेत व्यावसायिक व भाविकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर करू नये,
गॅस सिलिंडरचा वापर होणार नाही
ठळक मुद्देसर्वानुमते ठराव पारित : मार्कंडादेव, चपराळा यात्रेबाबत सभा