शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

साग संग्रहालय जपतेय आदिवासी संस्कृती व इंग्रजांच्या आठवणी

By admin | Updated: May 18, 2015 01:46 IST

वन विभागाच्या मदतीने बनविण्यात आलेल्या आलापल्ली येथील साग (टिक) संग्रहालयात आदिवासी संस्कृतीशी...

रोमित तोेंबर्लावार आलापल्लीवन विभागाच्या मदतीने बनविण्यात आलेल्या आलापल्ली येथील साग (टिक) संग्रहालयात आदिवासी संस्कृतीशी संबंधीत विविध प्रकारच्या वस्तू व इंग्रजकालीन कक्रचालयात वापरण्यात येणारी विविध साहित्य ठेवण्यात आली असून सदर साहित्य अत्यंत दुर्मिळ व जुन्या तंत्राज्ञानाची आठवण करून देणारे आहे. अशा प्रकारचे जिल्ह्यातील हे एकमेव संग्रहालय असून दरदिवशी शेकडो पर्यटक या संग्रहालयाला भेट देतात.आलापल्ली हे वन विभागाचे अगदी सुरूवातीपासूनच केंद्रबिंदू राहिले आहे. या ठिकाणी इंग्रजांच्या काळात लाकूड कापण्यासाठी मशीनचा वापर केला जात होता. या ठिकाणच्या परिसराला क्रकचालय म्हणून ओळखले जात होेते. नवीन तंत्राज्ञानाबरोबरच क्रकचालयातील मशीनचा वापर बंद पडला. या मशीनच्या आठवणी जपण्याच्या उद्देशाने या मशीनचे सुटे भाग व त्या कालावधीत वापरण्यात येणाऱ्या इतरही वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. या संग्रहालयाचे उद्घाटन १७ मे २०१४ रोजी तत्कालीन वन विभागाचे प्रधानसचिव प्रवीण परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी संस्कृती व वन विभागाबाबत सविस्तर माहिती देणारे एकमेव संग्रहालय आहे. या परिसरात येणारे अनेक पर्यटक, वन विभागाचे अधिकारी, आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक व इतिहासकार या संग्रहालयाला आवर्जून भेट देतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच गर्दी असल्याचे बघायला मिळते.बांबूपासून इमारत निर्मितीबांबुला रासायनिक मिश्रण लावून त्याची चौकोनी फ्रेम बनविण्यात आली. सदर फ्रेम लोखंडी साच्यामध्ये टाकून त्यामध्ये मॅग्नेशिअम क्लोराईड, मॅग्नेशिअम आॅक्साईड, गिट्टीचुरा, गिट्टीउष्ट व पाणी टाकण्यात आले. अशा प्रकारे चौकोनी पॅनल तयार करण्यात आले आहेत. पॅनलच्या प्रत्येक मध्यभागात सिमेंट, विटांचे बांधकाम करून भिंत उभारण्यात आली आहे. सदर इमारत अत्यंत कमी खर्चात तयार झाली आहे.कक्रचालयातील वस्तूइंग्रजकालीन कक्रचालयातील अनेक वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आरा जोडण्याची मशीन, ग्रार्इंडर मशीन, भुसा बंडी, आटा चक्की, तिजोरी, लिप्ट मशीन, करबा- कुटार मशीन, रोड रोलर, ट्रेन साकेट, सॉप्टींगपाना, गोल आरी, लाकुड कापण्याची ट्रॉली, चमचा लोहा, आग प्रतिबंधक सिलिंडर, कंदील, स्टोव्ह, बिनतारी संदेश यंत्रणा रजिस्टर, कामगारांची नोंदवही यांचा समावेश आहे. आदिवासींशी संबंधित वस्तूदैनंदिन जीवनात आदिवासी ज्या वस्तूंचा वापर करतात. सदर वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी, धीर, पावसाळ्यात रोवणी करताना पाऊस लागू नये म्हणून वापरल्या जाणारे रेकी, थंड पाण्याचे बुरक, माठातून पाणी काढण्याचे बोक, आदिवासींचे वाद्य हाकुमी, बांबुपासून बनविलेली बासरी, तनसीने तयार केलेली नेटी व आदिवासी संस्कृती दर्शविणारे छायाचित्र यांचा समावेश आहे.