गावापासून काही अंतरावर शेण खत ढिगारे दिसून येतात. याच मार्गावर लोकमान्य विद्यालय आहे. त्यामुळे विद्यार्थी ये-जा करीत असतात. रस्त्याच्या अगदी बाजूला खताचे ढिगारे टाकण्यात आले आहे. उंच असलेल्या ढिगावरून कचरा खाली उतरून रस्त्यापर्यंत पाेहाेचते. रस्ता अरुंद होत चालल्यामुळे रस्त्याने वाहन आले, तर बाजूला सरकण्यास जागा राहत नाही. दोन्ही बाजूला शेतजमीन आहे. पिकांच्या संरक्षण होण्यासाठी शेतकरी कुंपण करतात. रस्ता अरुंद असल्याने या रस्त्याने ये-जा करणे तारेवरची कसरत होत चालली आहे. या मार्गावर कोरोना संकट येण्यापूर्वी गडचिरोली आगाराची बस सुरू होती. शेणखताचे ढिगारे हटवावे, अशा सूचना अनेक वेळा संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, आम्हाला पर्यायी जागा नसल्याने रस्त्यावर शेण खत ढिगारे टाकावे लागत आहे, असे शेतकरी सांगतात. सार्वजनिक रस्त्याचा आपल्या स्वतःच्या हितासाठी वापर करणे अयोग्य आहे. याचा त्रास इतरांना सहन करावा लागत आहे. या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी आपल्या हितासोबत इतरांचा विचार करून रस्त्यावरील शेण खत ढिगारे हटवावे, अशी मागणी होत आहे.
===Photopath===
070521\07gad_3_07052021_30.jpg
===Caption===
मुरखळा मार्गावर असलेले शेणखताचे ढिगारे