शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विहीर बांधकामात शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:58 IST

धडक सिंचन विहीर उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० सिंचन विहीर मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र नियमापेक्षा कमी प्रमाणात विहीर खोदून दिली जात आहे.

ठळक मुद्देनियमापेक्षा कमी बांधकाम : धनादेशांद्वारे पैशाची उचल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धडक सिंचन विहीर उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० सिंचन विहीर मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र नियमापेक्षा कमी प्रमाणात विहीर खोदून दिली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यास मोठे घबाड समोर येण्याची चिन्हे आहेत.गडचिरोली जिल्ह्यात एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेऊन गडचिरोली जिल्ह्यासाठी ४ हजार ५०० सिंचन विहीर मंजूर केले आहे. या सर्व विहिरींचा निधी वेळेवर उपलब्ध करून दिला जात आहे. विहीर बांधकामासाठी शेतकऱ्याच्या बँक खात्यावर अडीच लाख रूपये उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. मात्र दुर्गम व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची दिशाभूल करून सदर काम कंत्राटदाराच्या मार्फत केले जात आहे. नियमानुसार विहिरीचे खोदकाम ३६ फूट एवढे असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात काही ठिकाणी २२ ते २५ फूट एवढेच काम करून दिले जात आहे. कंत्राटदारांनी शेतकऱ्यांकडून धनादेश घेऊन ठेवले आहेत. विहिरींचे पैसे जमा होतात. सदर पैसे कंत्राटदार धनादेशाद्वारे काढत आहे. सिंचन विहिरींच्या बांधकामवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सिंचन विभागाच्या अभियंत्यांची आहे. मात्र कंत्राटदार व अभियंत्यांची मिलीभगत असल्याने नियमापेक्षा कमी बांधकाम होऊनही विहीर पूर्ण झाल्याची परवानगी दिली जात आहे. या संपूर्ण प्रकरणात कोट्यवधी रूपयांची उलाढाल सुरू आहे.काही ठिकाणी कंत्राटदार अत्यंत निकृष्ट दर्जाच्या विहिरींचे बांधकाम करीत आहेत. बांधकामाचा दर्जा लक्षात घेतला तर सदर विहीर दोन-चार वर्षातच कोसळण्याची शक्यता आहे.गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला. मात्र या योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत केल्यास फार मोठे घबाड उघडकीस येणार आहे. ज्या उद्देशाने शेकडो कोटी रूपये राज्य शासनाने उपलब्ध करून दिले, त्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. सिंचन वाढण्याऐवजी विहिरींचे पैसे अभियंते व अधिकारी यांच्या खिश्यात जात आहेत.