महिला आघाडीवर : पाच वर्षांत १५ हजार ३२२ पुरूष तर १५ हजार ४५७ महिलांची नसबंदीदिलीप दहेलकर ल्ल गडचिरोलीकुटुंब नियोजनाचे वार्षिक उद्दीष्ट गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्राप्त झाले आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेच्या आकडीवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. मात्र या शस्त्रक्रियेत महिलांचा पुढाकार अधिक असून शस्त्रक्रियेत पुरूष माघारले असल्याचे दिसून येत आहे. २०१०-११ ते २०१४-१५ या पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात १५ हजार ३२२ पुरूष व १५ हजार ४५७ महिलांनी नसबंदी केली असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.२०१०-११ या वर्षात जिल्ह्याला एकूण ६ हजार ५०० कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट होते. यापैकी ३ हजार १ पुरूष व २ हजार ८१७ महिला अशा एकूण ५ हजार ८१८ जणांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी ८९.५१ आहे. २०११-१२ या वर्षात सहा हजार शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट जिल्ह्याला होते. यापैकी २ हजार ८१७ पुरूष व २ हजार ९६८ स्त्रिया अशा एकूण ५ हजार ७८५ जणांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी ९६.४२ आहे. २०१२-१३ या वर्षात जिल्ह्याला एकूण ६ हजार ३६६ कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट होते. यापैकी ३ हजार ३३३ पुरूष व ३ हजार ३४ स्त्रीया अशा एकूण ६ हजार ३६७ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी १०० आहे.२०१३-१४ या वर्षात जिल्ह्याला ६ हजार ५०० शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट होते. यात ३ हजार ३३१ पुरूष व २ हजार ९८९ महिला अशा एकूण ६ हजार ३३४ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी ९५.९६ आहे.२०१४-१५ या वर्षात ६ हजार ६५९ शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट होते. यात २ हजार ८४० पुरूष व ३ हजार ६४९ महिला अशा एकूण ६ हजार ४८९ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याची टक्केवारी ९७.४४ आहे.दोन वर्षांत मोठा फरक४२०१३-१४ व २०१४-१५ या दोन वर्षातील कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेची आकडेवारी बघितली असता, पुरूष व महिलांच्या शस्त्रक्रियेत मोठा फरक दिसून येतो. या दोन वर्षात ५ हजार ७९२ पुरूषांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली तर ७ हजार ३१ महिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली. १ हजार २३९ शस्त्रक्रिया महिलांच्या अधिक आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत पुरूषांचा पुढाकार वाढण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रभावी जनजागृती होणे गरजेचे आहे.पुरूषातील नसबंदीबाबतचे अज्ञान कारणीभूत४जिल्हा आरोग्य विभागाने पुरूष नसबंदीसाठी जनजागृती केली. मात्र पुरूष नसबंदीच्या आकडेवारीत फरक पडला नाही. यासाठी पुरूषामध्ये पुरूष नसबंदीविषयीचे अज्ञान कारणीभूत आहे. पुरूष कमावत असल्याने शस्त्रक्रियेमुळे अशक्तपणा येईल, या भितीने परिवारातील वरिष्ठ व्यक्ती पुरूष नसबंदीसाठी विरोध करीत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. काही कुटुंबात गैरसमजुतीमुळे सुध्दा महिलांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी पुढे केले जात असल्याचे दिसून येत आहे.
कुटुंब नियोजनात पुरूष माघारले
By admin | Updated: June 12, 2015 02:29 IST