शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

अतिक्रमण हटविले

By admin | Updated: January 24, 2015 22:53 IST

आरमोरी मार्गावर कठाणी नदीच्या पुलालगत आंध्रप्रदेशातील वारांगणांनी झोपड्या उभारून देह विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. नागरिकांच्या तक्रारीवरून पालिका प्रशासनाने शनिवारी चोख पोलीस

अतिक्रमणामुळे नदीपात्र घटले : नागरिकांच्या तक्रारीवरून कारवाईगडचिरोली : आरमोरी मार्गावर कठाणी नदीच्या पुलालगत आंध्रप्रदेशातील वारांगणांनी झोपड्या उभारून देह विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. नागरिकांच्या तक्रारीवरून पालिका प्रशासनाने शनिवारी चोख पोलीस बंदोबस्तात शासकीय जमिनीवरील या वस्तीतील अतिक्रमण हटविले. दरम्यान पोलिसांना पाहून तरूण मुली व आंबटशौकिनांनी पलायन केले.यापूर्वी विसापूर मार्गालगत पक्क्या घरांमध्ये देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता. मात्र प्रशासनाने पाऊले उचलून या वारांगणाच्या वस्तीतील अतिक्रमण काढून त्यांचा व्यवसाय बंद केला होता. त्यानंतर वारांगणा व आंबटशौकीनांची पंचाईत झाली. दीड महिन्यांपूर्वी आंध्रप्रदेशातील वारांगणा कठाणी नदी काठालगत शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून देह विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या वस्तीलगत शेती आहे, लगतच्या आरमोरी मार्गावरून गडचिरोली येथे परिसरातील मुली व मुले शिक्षण घेण्यासाठी येतात. याशिवाय या मार्गाने दिवसभर वाहनधारकांची वर्दळ असते. मार्गालगत असलेल्या या वारांगणाच्या वस्तीचा शेतकरी, महिला मजूर, पुरूष, शाळा महाविद्यालय मुले, मुली यांना त्रास होत होता. या संदर्भात नगराध्यक्ष निर्मला मडके व न.प. मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांच्याकडे लेखी तक्रार प्राप्त झाली होती. यापुढेही जाऊन नगराध्यक्ष निर्मला मडके यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून या वस्तीतील अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली होती. न.प. प्रशासनाने अतिक्रमण काढण्याबाबत १५ दिवसांपूर्वी येथील वारांगणांना मौखीक सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांनी अतिक्रमण काढले नाही. अखेर निर्वाणीचा इशारा म्हणून अतिक्रमण काढण्याच्या दोन दिवसांपूर्वी तत्काळ अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले. यावेळीही वारांगणांनी अतिक्रमण काढले नाही. अखेर न.प. प्रशासनाने कठोर पाऊले उचलत चोख पोलीस बंदोबस्तात जेसीबी व ट्रॅक्टरसह धडक देऊन या वस्तीतील अतिक्रमण काढले. यावेळी न.प. मुख्याधिकारी गिरिष बन्नोरे, अभियंता सुरज पुनवटकर, गिरिष मैंद, नंदाजी कुकडे, आर. पी. गिरोले तसेच गडचिरोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरिक्षक विकास दिंडोरे, पोलीस उपनिरिक्षक अंकूश माने व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)