राेजगार मेळाव्याला पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, अपर पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख, साैमय मुंडे, सुरक्षा रक्षक कंपनीचे मलेश यादव व दिनेश खाेब्रागडे आदी उपस्थित हाेते.
जिल्ह्यातील बेराेगजार युवकांना राेजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी पाेलीस विभागाने ‘राेजगार मेळावा’ हे ॲप तयार केले आहे. आतापर्यंत पाेलिसांच्या पुढाकाराने १ हजार ५०० युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रात राेजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. यात ३१९ सुरक्षा रक्षक, १०६० नर्सिंग असिस्टंट, ९२ हाॅस्पिटॅलिटी, ३६ ॲटाेमाेबाईल, तसेच १२९ युवक-युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन राेजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल म्हणाले, जिल्ह्यातील युवक -युवतींना राेजगार उपलब्ध करून देण्यासाठी पाेलीस दल नेहमी तत्पर आहे. आपल्या नात्यातील किंवा गावातील नागरिकांना राेजगार आवश्यक असल्यास याबाबत कळवावे, असे आवाहन गाेयल यांनी केले. कार्यक्रमासाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्यासह पाेलीस अधिकारी व जवानांनी सहकार्य केले.