शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
2
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
3
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
4
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
5
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
6
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
7
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
8
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
9
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
10
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
11
बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल
12
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
13
टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
14
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
15
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! ५ विकेट्सचा डाव साधत सेट केले अनेक विक्रम
16
भरला संसार विस्कटून टाकला! आधी पत्नी अन् तीन मुलांना संपवलं; नंतर स्वतःचाही जीव घेतला
17
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
18
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
19
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
20
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

कलेक्टर कॉलनीतील रस्त्यांचे ग्रहण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

महसूल विभागात शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी कॉम्प्लेक्स परिसरात शेकडो निवासस्थाने बांधली आहेत. त्यामुळे या निवासस्थानांचा परिसर कलेक्टर कॉलनी म्हणून ओळखल्या जाते. जिल्हा निर्मिती झाल्यानंतर पाच ते सहा वर्षानंतर या ठिकाणी निवासस्थाने बांधण्यात आली. जुन्या निवासस्थानांवर टिनाचे पत्रे टाकली आहेत.

ठळक मुद्देरस्त्यांना झुडुपांचा वेढा : अनेक वर्षांपासून डागडूजी नसल्याने उखडले डांबर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रभाग क्रमांक १० मध्ये येत असलेल्या कलेक्टर कॉलनीतील काही रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट कॉंक्रिटीकरण केले असले तरी बहुतांश रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती झाली नसल्याने डांबर उखडून जाऊन खड्डे पडले आहेत. काही क्वॉटर्रकडे जाणारे रस्ते अजूनही कच्चे आहेत. रस्त्यांच्या बाजूला झुडपे उगविली आहेत.महसूल विभागात शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी कॉम्प्लेक्स परिसरात शेकडो निवासस्थाने बांधली आहेत. त्यामुळे या निवासस्थानांचा परिसर कलेक्टर कॉलनी म्हणून ओळखल्या जाते. जिल्हा निर्मिती झाल्यानंतर पाच ते सहा वर्षानंतर या ठिकाणी निवासस्थाने बांधण्यात आली. जुन्या निवासस्थानांवर टिनाचे पत्रे टाकली आहेत. काळाच्या ओघात सदर टिनाचे पत्रे गंजून छिद्र पडल्याने त्यातून पाणी झिरपत होते. पावसाळ्यात या ठिकाणी राहणेसुद्धा कठिण होत होते. यावर्षीपासून टिनाचे पत्रे बदलविण्यास सुरूवात झाली आहे. बांधकाम विभागाने तीन ते चार रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे. मात्र बहुतांश रस्ते अजुनही डांबरीच आहेत. विशेष म्हणजे, या रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे डांबर निघून खड्डे पडले आहेत. काही निवासस्थानांच्या समोर तर अजुनपर्यंत कच्चे रस्ते सुद्धा झाले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात चिखल तुडवत निवासस्थान गाठावे लागते. कलेक्टर कॉलनीतील अंतर्गत रस्ते अतिशय रूंद आहेत.संपूर्ण रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण करणे शक्य नसल्याने जवळपास १५ फुट रूंदीचे डांबरीकरण केले आहे. रस्त्याच्या बाजूच्या भागावर मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. तसेच काही निवासस्थानाकडे जाणाºया रस्त्यांवर मोठमोठी झुडपी आहेत. झुडुपे व मोठमोठे गवत यामुळे साप, विंच्चू व इतर किटकांचा धोका आहे. विशेष म्हणजे, सदर निवासस्थाने जरी महसूल विभागाची असली तरी या कॉलनीत निवासस्थानांकडून नगर परिषद गृहकर वसूल करते. त्यामुळे या ठिकाणचे रस्ते बांधणे, स्वच्छता राखणे, पाणी पुरवठा करणे ही बाब नगर परिषदेची आहे. मात्र नगर परिषद या कॉलनीला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळेच शहरात इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असताना कलेक्टर कॉलनीत सुविधा पुरविण्याकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.नवीन वस्त्यांमध्ये रस्ते व नाल्यांची समस्याविसापूर, कॉम्प्लेक्स परिसरातही गडचिरोली शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. या ठिकाणी ले-आऊट टाकून प्लॉटची विक्री केली जात आहे. प्लॉट विक्री करण्याच्यापूर्वी संबंधित प्लॉटमालकाने नाली, कच्चा रस्ता, वीज या सुविधा पुरविणे आवश्यक आहे. मात्र प्लॉटमालक या सुविधा न पुरविताच प्लॉटची विक्री करीत आहेत. प्लॉट खरेदी केल्यानंतर दोन ते तीन वर्षाने नागरिक घर बांधतात. त्यानंतर आपल्या घरासमोरचा रोड, नाली व्हावी, यासाठी नगर परिषदेकडे तगादा लावतात. मात्र शहराचा होणारा विस्तार व प्राप्त होणारा निधी लक्षात घेतला तर वाढीव वस्त्यांमध्ये लवकर रोड व नालीचे बांधकाम करणे शक्य होत नाही. हा नियम कॉम्प्लेक्स परिसरातील प्लॉटलाही लागू होते. त्यामुळे नवीन वस्त्यांमध्ये रस्त्यांची समस्या कायम आहे.काही रस्त्यांची निर्मिती दहा वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर नगर परिषदेने सदर रस्ते दुरूस्त केले नाहीत. त्यामुळे डांबर उखडून खड्डे पडले आहेत. नगर परिषद नवीन रस्त्यांच्या बांधकामाकडे लक्ष देत आहे. जुने रस्तेसुद्धा दुरूस्त करणे आवश्यक आहे. नाल्यांचा उपसा वेळोवळी होत असल्याने नाली चोकअप होण्याची फारशी समस्या नाही.- रमाकांत चुनारकर, नागरिक,प्रभाग क्रमांक १०उन्हाळ्यात विसापूर वॉर्डात केवळ दोन ते तीन गुंडच पाणी मिळत होते. या वॉर्डात पाणी समस्या ही एकमेव मोठी समस्या होती. त्यामुळे या वॉर्डासाठी पाणी टाकी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करणे हे आपले मुख्य ध्येय होते. शासनाने पाणी टाकीसाठी २ कोटी ९० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पाच लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी बांधली जाणार आहे. पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. पाणी टाकी ही लवकरच बांधली जाईल. विसापूर ते पाथरगोटा पांदन रस्ता बांधला आहे. प्रभाग क्रमांक १० साठी १६ लाख रूपयांचे वाढीव पोल मंजूर आहेत. त्याचे काम लवकरच सुरू होईल. विसापूर मार्ग ते कोटगल मार्गाला जोडणारा एसपी ऑफिस समोरील रस्त्याचे रूंदीकरण होणार आहे. एलआयसी कॉलनीमधील ओपन स्पेसवर बगीचाची निर्मिती केली आहे. मात्र या ठिकाणी बोअर नसल्याने पाण्याची सुविधा नव्हती. परिणामी गवत करपूर गेले.- केशव निंबोळ, नगरसेवक, प्रभाग क्र.१०पोलीस संकूल कॉलनीमधील बहुतांश मार्गांचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सोनापूर कॉम्प्लेक्समधील रस्त्यांचे खडीकरण व नाल्यांचे बांधकाम झाले आहे. एलआयसी कॉलनीतील ओपन स्पेसचे काम पूर्ण झाले आहेत. तर विसापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील ओपन स्पेसचे काम सुरू व्हायचे आहे. विसापुरात पाण्याची टाकी झाल्याने तेथील नागरिकांची पाण्याची समस्या कायमची सुटणार आहे.- गीता पोटावी, नगरसेविका, प्रभाग क्रमांक १०मुख्य मार्गाचे होणार रूंदीकरणविसापूर मार्गावरील टि-पाईंट- स्मृति उद्यान, पोलीस अधीक्षक कार्यालय ते कोटगलकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक शासकीय कार्यालये, निवासस्थाने आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. या मार्गाचे डांबरीकरण, रूंदीकरण केले जाणार आहे. यासाठी जवळपास पावणे तीन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा