शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

सीझरीन शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर नसल्याने पुन्हा एक नवजात शिशु दगावले

By admin | Updated: December 29, 2014 23:41 IST

निगरगट्ट झालेल्या आरोग्य यंत्रणेने सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात तीन नवजात शिशूंचा बळी घेतला आहे. सीमावर्ती सिरोंचा तालुक्यात या घटना घडल्या आहे.

गडचिरोली : निगरगट्ट झालेल्या आरोग्य यंत्रणेने सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात तीन नवजात शिशूंचा बळी घेतला आहे. सीमावर्ती सिरोंचा तालुक्यात या घटना घडल्या आहे. मात्र आरोग्य विभागाने गंभिरतेने या घटनेची दखल घेण्याऐवजी सावरासावर करण्याची भूमिका चालविली असल्याने आरोग्य यंत्रणेविषयी सर्वसामान्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. छत्तीसगड-तेलंगणा सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात आरोग्याच्या फारशा सुविधा उपलब्ध नाहीत. बोटावर मोजण्याएवढेच आरोग्य केंद्र व सिरोंचा येथे ग्रामीण रूग्णालय आहे. मात्र या रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहे. त्यामुळे बाळंतपणाच्या अनेक केसेस ग्रामीण भागातून सिरोंचा येथे पाठविल्या जातात. मात्र सिरोंचा रूग्णालयात सीझरीन शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर नाहीत. येथील डॉक्टर एका खासगी दवाखान्याने ज्यादा पगारावर पळवून नेले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अशाच स्थितीत २७ डिसेंबरला अंकिसा गावाजवळील जंगलपल्ली येथील समक्का महेश पेरकरी (२७) या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर अंकिसा रूग्णालयात आणण्यात आले. तेथील डॉ. सादमवार यांनी या महिलेची नार्मल डिलेव्हरी करण्याचा कसोशीचा प्रयत्न केला. मात्र सीझरीनशिवाय महिलेच्या पोटातून नवजात शिशू काढता येणे शक्य नव्हते. सिरोंचा रूग्णालयात सीझरीन शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर नाही. ही बाब लक्षात घेऊन तेलंगणा राज्यातील दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. तब्बल पाच ते सातासाचा गोदावरी नदीतून बोटीवर प्रवास करीत शिशूचा एक हात बाहेर निघालेला अवस्थेत असतानाही महिलेला करीमनगर जिल्ह्याच्या गोदावरीखनी येथील रूग्णालयात पोहोचविण्यात आले. तेथे शस्त्रक्रिया करून महिलेचे शिशू काढण्यात आले. मात्र ते मृतावस्थेत होते. त्याचे वजन साडेतीन किलो होते. अंकिसा, सिरोंचा रूग्णालयात महिलेला सीझरीन शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर मिळाले असते तर सदर महिलेचे अपत्य वाचले असते. मात्र सिरोंचा तालुक्यासाठीची आरोग्य यंत्रणा विभागाने सजग केली नाही. त्यामुळे आणखी एका महिलेला आपले नवजात शिशू गमवावे लागले. (जिल्हा प्रतिनिधी)