कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफ बटालियनचे असिस्टंट कमांडंट रंजित सरकार हाेते. प्रमुख अतिथी सरपंच लक्ष्मी मडावी, पशुधन विकास अधिकारी पवन पावडे, कृषी अधिकारी कांबळे, पाेलीस पाटील कमला सडमेक, ग्रामसेवक वासुदेव बाटवे, कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम, उपसरपंच सचिन ओलेटीवार, विलास नेरला, रेपनपल्ली उपपाेलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पांडुरंग हाके, पोलीस उपनिरीक्षक विनोद आबुज, एसआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक जाधव व नागरिक उपस्थित होते. सहायक कृषी अधिकारी कांबळे यांनी आधुनिक शेतीचे फायदे, शेती कोणत्या पद्धतीने करावी. बियाणे व खतांचा योग्य वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. पवन पवार यांनी गाई-म्हशी शेळ्या यांना येणाऱ्या रोगराईविषयी माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक आबुज यांनी तरुणांना पोलीस भरतीबाबत मार्गदर्शन केले. कृषी मेळाव्यात दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, आदींचे चालक परवाने वितरित करण्यात आले. अनेक नागरिकांचे पॅन कार्ड काढण्यात आले; तर जॉब कार्ड व रेशन कार्ड वाटप करण्यात आले.
160721\img-20210714-wa0007.jpg
रेपनपल्ली येथे कृषी मेळावा संपन्न