शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

गावाचा पार अन् पाटलाची ओसरी नष्ट

By admin | Updated: November 16, 2015 01:33 IST

ढोलकीवरील थाप आणि बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा झंकार ऐकायला आला की, अख्खा मोहल्ला एकत्र यायचा.

नंदीबैैलवाल्यांची खंत : आधुनिकतेने ग्रामीण भागातील मौज संपलीप्रदीप बोडणे वैरागडढोलकीवरील थाप आणि बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा झंकार ऐकायला आला की, अख्खा मोहल्ला एकत्र यायचा. मग नंदीबैलवाल्यांच्या सूचनेप्रमाणे झुल, चौरंगांनी नटलेला नंदीबैल प्रत्येकाची ओळख सांगायचा. नंदीबैलाचा शहाणपणा पाहून सारेच थक्क व्हायचे आणि सांगायच्या आतच घराघरातून पसाभर दानरूपी धान्य नंदीवाल्यांना प्राप्त व्हायचे. मग दुपारी विश्रांती पाटलाच्या ओसरीत किंवा गावाच्या पारावर अन् भोवती गोळा झालेल्या बायाबापड्यांबरोबर इतकी चर्चा रंगायची, माथ्यावरचा सूर्य कधी उतरणीला गेला याचे भान नसायचे. परंतु आता गावाचा पार अन् पाटलाची ओसरी नष्ट झाली आहे, अशी खंत शंकर नंदीबैलवाल्याने व्यक्त केली. नोव्हेंबर ते जानेवारी हा कालखंड ग्रामीण भागासाठी सुगीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. वर्षाचे आठ महिने आपल्या स्वगावी राहिलेले नंदीबैलवाले आपल्या पोटाची खळगी भरण्याकरिता गावाबाहेर पडत असत. गाव, खेड्यापाड्यांत फिरून नंदीबैलामार्फत हुन्नर दाखवून मिळेल ते ग्रहण करायचे. पूर्वी लोककलेतील पांगुळ, गोरखनाथ, बहुरूपी आणि नंदीबैलवाल्यांना मानाचे स्थान होते. दोनवेळच्या जेवणासाठी लाचार होण्याची वेळ त्यांच्यावर येत नव्हती. मात्र आता काळ बराच बदलला. बदलत्या काळाबरोबरच सारेच बदलल्याचे नंदीबैलवाल्याने मत व्यक्त केले. गावाच्या मोक्याच्या ठिकाणी किंवा आठवडी बाजाराच्या ठिकाणी नंदीबैलवाल्यांचा मुक्काम असायचा. दुसऱ्या दिवशी गावाच्या पाटलाला सलाम ठोकून पंचक्रोशीतील गावे फिरून पुढील आठ महिन्यांची व्यवस्था ते करीत असायचे. परंतु आता दिवस बदलल्याने माणसातही बदल झाला. रस्त्याने फिरणाऱ्या अथवा कसरती करणाऱ्यांच्या करामती पाहण्याची वेळसुद्धा लोकांना नाही तर ते कोठून त्यांना दान करणार. पूर्वीचा गावाचा पार व पाटलाची ओसरी या काळात कुठे चालणार, त्यामुळेच आता नंदीबैैलवाल्यांचेही ‘अच्छे दिन’ संपले.पूर्वीच्या काळातील पार व ओसरीचे महत्त्वपाटील व जमिनदारांचे प्राबल्य असलेल्या काळात गावातील प्रमुख चौकात पार असायचा. पार म्हणजे, गावातील संपूर्ण लोक एकत्रित येण्याकरिता तयार करण्यात आलेला उंचवटा अथवा मंच होय तसेच या काळात ओसरीलाही अधिक महत्त्व होते. ओसरी पाटलांच्या घरी असायची. या ठिकाणी बाहेरून आलेल्या लोकांची राहण्याची व्यवस्था केली जायची. या ओसरीत बाहेरून आलेले कलावंत त्याबरोबरच फिरस्थी आश्रय घेत असत. परंतु गावातील पार व पाटलांची ओसरी नष्ट झाल्याने यांना आश्रय मिळणेही दुरापास्त झाले आहे. पूर्वीच्या काळात पार व ओसरीचे या अनुषंगाने अतिशय महत्त्व होते.