शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

गटारलाईनचे काम वेळेत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे या भागात भूमिगत गटार लाईनचे काम सुरू करण्यास संबंधित कंत्राटदाराने दिरंगाई केली. गटारलाईनसाठी खोदकाम केलेल्या रस्त्याची डागडुजी न केल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर सर्वत्र चिखलमय स्थिती पाहावयास मिळते.

ठळक मुद्देरामनगरवासीयांची मागणी : रस्ते चिखलमय झाल्याने आवागमनास त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रामनगर प्रभाग क्रमांक ४ मध्ये नगर परिषदेच्या वतीने भूमिगत गटार लाईनचे काम सुरू आहे. परंतु सदर काम संथगतीने सुरू असल्याने वॉर्डातील नागरिकांना चिखलमय रस्त्याने आवागमन करावे लागत आहे. सदर गटार योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी मागणी वॉर्डवासीयांनी केली आहे.लॉकडाऊनमुळे या भागात भूमिगत गटार लाईनचे काम सुरू करण्यास संबंधित कंत्राटदाराने दिरंगाई केली. गटारलाईनसाठी खोदकाम केलेल्या रस्त्याची डागडुजी न केल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर सर्वत्र चिखलमय स्थिती पाहावयास मिळते. स्थानिक प्रशासनाच्या वतीने १ वर्षापूर्वी भूमिगत गटार लाईनचे काम शहरातील सर्वच वॉर्डात सुरू करून रस्त्याच्या मधोमध खोदकाम करुन पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र त्या रस्त्यांची डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष झाले. पावसाळा सुरू होताच रस्त्यावर चिखल निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांना रस्त्याने आवागमन करताना त्रास होत आहे. रस्त्याच्या मधोमध केलेल्या खोदकामामुळे या ठिकाणी किरकोळ अपघातही घडले आहेत.कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अद्यापही रस्त्याच्या डागडुजीचे काम झाले नाही. परिणामी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित कंत्राटदाराने रस्त्याची लवकर डागडुजी करावी तसेच गटारलाईनचे काम विहित कालावधीत पूर्ण करावे, अशी मागणी नगरसेविका अनिता विश्रोजवार यांनी केली आहे. पावसाळ्यात वॉर्ड परिसरात गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गटारलाईनचे काम वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा