ऑनलाईन लोकमतगडचिरोली : सध्याच्या परिस्थितीत बहुजन चळवळीची राजकीय स्थिती लक्षात घेता कोणतेही पक्ष स्वबळावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. त्यामुळे सर्व समविचारी पक्ष व संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहन बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. डॉ. सुरेश माने यांनी केले.बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीच्या वतीने गडचिरोली येथे नुकतेच राजकीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून बोलत होते. शिबिराचे उद्घाटन बीआरएसपीचे विदर्भ राज्य अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मंचावर जि.प. सदस्य अॅड. लालसू नोगोटी, डॉ. रमेश जनबंधू, प्रा. संजय मगर, विलास कोडापे, डॉ. कैलास नगराळे आदी उपस्थित होते. आगामी निवडणुका व ‘बीआरएसपीची भूमिका’ या विषयावर डॉ. माने यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. कैलास नगराळे, संचालन पुरूषोत्तम रामटेके तर आभार राज बन्सोड यांनी केले. यशस्वीतेसाठी बीआरएसपीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
समविचारी पक्षांनी एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:37 IST
सध्याच्या परिस्थितीत बहुजन चळवळीची राजकीय स्थिती लक्षात घेता कोणतेही पक्ष स्वबळावर निवडणूक जिंकणे शक्य नाही.
समविचारी पक्षांनी एकत्र यावे
ठळक मुद्देसुरेश माने यांचे आवाहन : बीआरएसपीतर्फे प्रशिक्षण शिबिर