गडचिरोली : जिल्हाभर भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज गुरूवारी स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.देसाईगंज येथे स्वच्छ भारत समृध्द भारत अभियान सुरूवात कार्यक्रमाला फवारा चौकात माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, देसाईगंजचे नगराध्यक्ष शाम उईके, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, सभापती शालू दंडवते, नगरसेवक मुरलीधर सुंदरकर, राजेश जेठाणी आदी उपस्थित होते. शहराच्या अनेक भागाची त्यांनी आज स्वच्छता केली. तसेच भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाचाही शुभारंभ याप्रसंगी करण्यात आला. आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव डोंगरगाव येथेही ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, गोपाल भांडेकर, सुरेश जुआरे, नंदू पेटेवार, देवाजी ढोरे, रूपेश शेट्टे, नानाजी राऊत, प्रकाश लोणारे, रामभाऊ कुर्झेकर, सुनिल बांगरे, दत्तू उपरीकर, गंगाधर कुकडकर, एकनाथ बोरकर, शालिकराम बुराडे आदी उपस्थित होते. यावेळी १२० सदस्यांची नोंदणीही भाजपने केली.सिरोंचा येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते ब्रम्हानंद कोत्तागट्टू, तालुकाध्यक्ष संदीप राचर्लावार, कलाम हुसेन, रवी चकीनारपू, रमेश मारगोनी, लिंगय्या माटगोनी, श्रीधर आनकरी, संतोष तोटा आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाभर भाजपच्यावतीने आज विविध कार्यक्रम घेण्यात आले.
भाजपने केली गावागावांत स्वच्छता
By admin | Updated: December 25, 2014 23:32 IST