गडचिराेली जिल्ह्यातील लाेकसंख्या विरळ आहे. तसेच गावांची लाेकसंख्या अतिशय कमी आहे. एका रेशन दुकानाला जवळपासच्या पाच ते सहा गावांतील लाभार्थी जाेडल्या गेली आहेत. धान्य आणण्यासाठी दुसऱ्या गावाला जावेच लागते. अशातच जवळपासच्या गावातील दुकानदाराने राजीनामा दिल्याने हे दुकान दुसऱ्या गावच्या दुकानाला जाेडले गेले आहे. त्यासाठी नागरिकांना पुन्हा १२ ते १५ किमींची पायपीट करून रेशन आणावे लागत हाेते. एवढे अंतर चालून जाण्यापेक्षा काही लाभार्थी धान्य आणत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन ज्या गावचे रेशन दुकान बंद पडले आहे. हे दुकान चालविण्यासाठी महिला बचत गट, संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकूण १६८ गावांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. काही गावातील बचत गटांसाठी माेठी स्पर्धा असल्याचे दिसून येते. एका दुकानासाठी चार ते पाच बचत गटांनी अर्ज केले आहेत.
बाॅक्स
किती दुकाने सुरू हाेणार
तालुका दुकाने
मुलचेरा ०५
आरमाेरी २२
एटापल्ली २०
कुरखेडा १४
अहेरी २०
चामाेर्शी १८
भामरागड १३
गडचिराेली १८
धानाेरा ३०
काेरची ०८
एकूण १६८
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
पडताळणीची प्रक्रिया शिल्लक
गावातील महिला बचत गट व संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जांची छाननी करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. एकाच गावातील दुकानासाठी अनेक संस्था किंवा बचत गटांचे अर्ज आले असल्यास समिती याेग्य ताे निर्णय घेणार आहे. पडताळणीची प्रक्रिया लवकरच पार पाडली जाईल, अशी माहिती पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बाॅक्स
अनेक वर्षांपासून पायपीट
एखाद्या रेशन दुकानदाराने राजीनामा दिल्यानंतर तीन महिन्यांच्या आत दुसऱ्या दुकानदाराची नियुक्ती हाेणे आवश्यक आहे. मात्र, पुरवठा विभागाने नवीन दुकानदारांच्या नियुक्तीसाठी प्रक्रियाच पार पाडली नाही. त्यामुळे काही दुकाने अनेक वर्षांपासून दुसऱ्या दुकानांना जाेडण्यात आली हाेती. नागरिकांना १० ते १२ किमी अंतरावरून धान्य आणावे लागत हाेते.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
पावसाळ्यात लाभार्थी धान्यापासून वंचित
गडचिराेली जिल्ह्यातील अनेक गावे अजूनही बारमाही रस्त्यांनी जाेडण्यात आली नाहीत. पावसाळ्यात या गावांचा संपर्कच तुटतो. गावात जड वाहन नेणे शक्य नाही ही बाब लक्षात घेऊन पावसाळ्यातील चार महिन्यांचे धान्य अगाेदरच पाेहाेचविले जाते. मात्र, दुसऱ्या गावाला रेशन दुकान जाेडलेले गाव लाभार्थ्यांच्या गावापासून बरेच दूर राहते. पावसाळ्यात या गावालाही पाेहाेचणे कठीण हाेते. अशावेळी लाभार्थी त्या गावी जाऊन धान्य आणत नाही व उपासमारीचा सामना करतात.