लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : बाेगस डाॅक्टरांचा शाेध घेण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर समित्या आहेत. समितीमधील सदस्यांना काेणत्या गावात काेणता बाेगस डाॅक्टर आहे. याची माहिती राहते. मात्र ते काेणतीही कारवाई करीत नाही.अजूनही काेणतीही डिग्री नसलेले अनेक डाॅक्टर ग्रामीण भागात उपचार करीत असल्याचे दिसून येते. ताप, सर्दी, खाेकला, अंगदुखी यासारख्या सर्वसाधारण आजारांसाठी नागरिक शहरातील अधिकृत डाॅक्टरकडे येत नाही. तर ते गावातच असलेल्या एखाद्या बाेगस डाॅक्टरकडे उपचार घेतात. उपचारानंतर सर्दी, ताप, खाेकला कमी हाेत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा या डाॅक्टरांवर विश्वास वाढायला लागला आहे. काेराेना कालावधीत तर या डाॅक्टरांची चांदीच हाेती. सर्दी, ताप, खाेकला आदी लक्षणे असलेल्या रुग्णाची काेराेना चाचणीच केली जात हाेती. त्यामुळे रुग्ण शहरातील खासगी डाॅक्टरांकडे तसेच सरकारी रुग्णालयातही जात नव्हते. या कालावधीत गंभीर आजार असला तरी बाेगस डाॅक्टरकडेच जात हाेते.
तक्रार हाेत नाहीवैद्यकीय अभ्यासक्रमाची काेणतीही डिग्री नसलेले अनेक डाॅक्टर गडचिराेली तालुक्यासह अनेक गावांमध्ये कार्यरत आहेत. मात्र ग्रामीण भागातील नागरिक याबाबत तक्रार करीत नाही. कुणाचीही तक्रार नसल्याचे सांगून आराेग्य विभागसुद्धा काेणतीही कारवाई करीत नाही.
आरोग्य सहायक व सेविकांना राहते माहितीवैद्यकीय क्षेत्राचा कोणतेही प्रमाणपत्र नसताना केवळ दुसऱ्या डॉक्टरकडे काही दिवस मदतनीस म्हणून केल्यानंतर स्वत:चा डॉक्टरकीचा व्यवसाय एखाद्या मोठ्या गावात सुरू करतात. जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या गावांमध्ये अशाप्रकारचे डॉक्टर आढळून येतात. आरोग्य सहायक, आरोग्य सेविका या ग्रामीणस्तरावर काम करीत असल्याने त्यांना या बोगस डॉक्टरची माहिती राहते. मात्र ते तक्रार करीत नाही.
इंजेक्शनवर चालते व्यवसायशहरातील डाॅक्टर रुग्णाची तपासणी केल्यानंतर सहजासहजी इंजेक्शन देत नाही. केवळ गाेळ्या लिहून देतात. केवळ गाेळ्यांनी आपली तब्येत बरी हाेते यावर ग्रामीण भागातील नागरिकांचा विश्वास नाही. बाेगस डाॅक्टर मात्र इंजेक्शन देतात. जेवढे इंजेक्शन अधिक तेवढे अधिक पैसे आकारले जातात. त्यामुळे ते किमान दाेन ते तीन इंजेक्शन देतात.