शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

वर्षभरात दुसरी जाळपोळ

By admin | Updated: January 24, 2015 01:00 IST

माओवाद्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याचा निषेध करीत २६ जानेवारी गणतंत्रदिनी ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे.

गडचिरोली : माओवाद्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याचा निषेध करीत २६ जानेवारी गणतंत्रदिनी ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. त्याच्या चार दिवसांपूर्वीच इशारा म्हणून त्यांनी जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात असलेल्या येडमपायली जंगलात खासगी कंत्राटदाराच्या वाहनांची जाळपोळ गुरूवारी केली. वर्षभरामध्ये जाळपोळीची ही दुसरी घटना आहे. वाहने जाळल्यामुळे येडमपायली-जळेगाव रस्त्याचे काम थांबविण्यात आले आहे.गडचिरोलीपासून ५० किलोमीटरवर आणि धानोरापासून ६० किलोमीटरवर असलेल्या येडमपायली या गावापासून १४ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात येत आहे. येडमपायली ते जळेगावपर्यंत जाण्याकरिता आधी छोटा आणि कच्चा रस्ता होता. गेल्या वर्षी या रस्त्याचा समावेश डीपीसीच्या आराखड्यात करण्यात आला. त्यानंतर या रस्त्याकरिता तरतूद करण्यात आली. निविदा प्रक्रियेमध्ये हैदराबाद येथील सरला कंस्ट्रक्शनला या रस्त्याचे कंत्राट मिळाले. १७ कोटी रूपये खर्च करून हा १४ किमीचा दीड पदरी रस्ता तयार करण्यात येत आहे. रस्त्याचे खोदकाम करून महिनाभरात खडीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. या कामावर ३० मजूर कार्यरत होते. व्हायब्रेटरी रोलरने खडीकरणाची दबाईचे काम सुरू असताना गुरूवारी सायंकाळी ४ ते ५ वाजतादरम्यान १५ ते २० माओवादी अचानक येडमपायली येथे पोहोचले. माओवाद्यांनी मजुरांना काम थांबविण्याचे फर्मान सोडून बाजुला होण्यास सांगितले. त्यानंतर सरला कंस्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांना दमदाटी केली. त्यामुळे या अधिकारी व मजुरांनी रस्त्याचे काम तातडीने थांबविले. वाहने रस्त्याच्या बाजुला केली. त्यानंतर माओवाद्यांनी परिसरातून लाकडे जमा करून वाहनाखाली पेटविली. लाकडे पेटताच वाहनेदेखील जळायला लागली. रस्त्याच्या कामावर असलेल्या मजुरांनी येडमपायली गावाच्याजवळ दोन झोपड्या उभारल्या आहेत. तेथे चालक व इतर मजूर निवासी राहत होते. माओवाद्यांनी वाहने जाळल्यानंतर मजुरांचा थरकाप उडाला. जाळपोळीनंतर माओवाद्यांनी घोषणा देत घटनास्थळावरून काढता पाय घेतला. हैदराबाद येथील सरला कंस्ट्रक्शन कंपनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये रस्त्याची कामे घेत असते. गेल्या वर्षी या घटनेच्या १४ जानेवारी २०१३ रोजी धानोरा तालुक्यातील गोडलवाही येथे माओवाद्यांनी जाळपोळ केली होती. २१ एप्रिल २०१४ रोजी अहेरी तालुक्यातील दोडगिर मार्गावर जिमलगट्टा भागात पाच ट्रक-ट्रेलर जाळले होते. ही वाहनेदेखील सरला कंस्ट्रक्शन कंपनीची असल्याचे सांगण्यात येते. (लोकमत न्यूज नेटवर्क)प्रत्युत्तराचा प्रयत्नगेल्या दोन वर्षात सीआरपीएफ व सी-६० च्या पोलिसांनी माओवाद्यांविरोधात आघाडी उघडली आहे. त्यामध्ये माओवाद्यांचे मोठ्या प्रमाणावर एनकाऊंटर करण्यात आले. तसेच आत्मसमर्पण योजनेत मोठ्या प्रमाणात माओवाद्यांच्या सहकाऱ्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे माओवादी चळवळीची पाळेमुळे उखडली जात असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर गुरूवारी माओवाद्यांनी केलेली जाळपोळ पोलिसांच्या अभियानाला प्रत्युत्तर देण्याचा प्रकार असल्याचे सांगितले जाते.सर्वात आधी पत्रकार पोहोचलेही घटना दुर्गम भागात असल्याने रात्री उशिरापर्यंत जाळपोळीची माहिती गडचिरोलीत पोहोचली. मात्र त्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. शुक्रवारी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तत्पूर्वी सकाळी ९.३० वाजतादरम्यान पत्रकार येडमपायली गावात पोहोचले. तेथे त्यांना वाहने जळत असल्याचे दिसून आले. घटनेबाबत माहिती सांगण्यास कोणी फारसे उत्सुक नव्हते.