गडचिरोली : २०१४ या वर्षातील १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या ९ महिन्याच्या कालावधीत ४४८ नागरिकांनी नव्या कार खरेदी केल्या आहे. ९ महिन्यात ४४८ कारची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्यात आली आहे. गतवर्षी २०१३ मध्ये १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत एकूण ७२२ कारची खरेदी करून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे २०१३ च्या डिसेंबर या एका महिन्यात सर्वाधिक १८२ नव्या कारची नोंदणी झाली होती. गडचिरोली जिल्ह्यात दिवसेंदिवस चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरी भागात तर एकाच कुटुंबात तीन पेक्षा अधिक वाहने असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातही २० टक्के कुटुंबिय दुचाकी वाहने वापरत असल्याचे चित्र आहे. धावपळीच्या युगात कमी वेळात अधिकाधिक कामे उरकण्याच्या लगबगीसाठी दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वापरास पसंती दिली जाते. महामंडळाच्या एसटीचा प्रवास वेळखाऊ आहे. तसेच तासनतास एसटीची वाट पाहण्यात बराचवेळ निघून जातो. त्यामुळे अनेक नागरिकांनी स्वत:च्या हक्काचे वाहने खरेदी करून कमी वेळात अधिक कामे उरकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.योग्यता प्रमाणपत्र वैध असल्याशिवाय कोणत्याही वाहनचालकाने आपले वाहन रस्त्यावर चालवू नये, ज्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेली आहे, अशी वाहने वाहतुकीत आढळून आल्यास वाहनांना दंड आकारणी करण्यात येईल, असा फतवा उपप्रादेशिक परिवहन विभागाने काढला होता. सदर नियम दुचाकी वाहनाला नसून केवळ परिवहन वाहनांसाठी आहे. परिवहन वाहनांमध्ये आॅटो रिक्षा, टॅक्सी, तीनचाकी मालवाहक वाहन, स्कूल बस, खासगी सेवेतील वाहन, रूग्णवाहिका, नॉन कृषक ट्रेलर आदींचा समावेश आहे. योग्यता प्रमाणपत्र वैधता संपुष्टात आलेल्या वाहनधारकांना परवाना व योग्यता प्रमाणपत्राचे त्वरित नुतनीकरण करून घ्यावे, तपासणी मोहिमेमध्ये ज्या वाहनाकडे परवाना व योग्यता प्रमाणपत्र वैध नसल्यास अशा वाहनांना रस्त्यावर चालण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. वैधता मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाच्या योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या ट्रक, टॅम्पो, लहान एलएमबी, रिक्षा, टॅक्सी व बसेस आदी वाहनांद्वारे वाहतुकीदरम्यान अपघात होण्याची दाट शक्यता असते, कारण अशा वाहनांचा फिटनेस बिघडलेला असतो. त्यामुळे अशी वाहने वाहतुकीवर अधिक धोकादायक असतात. अपघाताचे प्रमाण वाढू नये, या उद्देशाने परिवहन विभागाने परवाना व योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे सक्त निर्देश दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेती व्यवसायावर अवलंबून आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ दरवर्षी बसत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कार खरेदीकडे कल नाही. (स्थानिक प्रतिनिधी)
नऊ महिन्यात जिल्ह्यात ४४८ कारची नोंदणी
By admin | Updated: December 31, 2014 23:24 IST