शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

१४ वर्षांत ७०० किमीचे नवीन रस्ते

By admin | Updated: December 25, 2014 23:32 IST

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १४ वर्षांत ६९७.३७ किमीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश रस्ते २५० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांपर्यंत पोहोचली आहेत.

गडचिरोली : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १४ वर्षांत ६९७.३७ किमीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश रस्ते २५० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांपर्यंत पोहोचली आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावे बारमाही रस्त्याने जोडण्याचे धोरण अवलंबण्यात आले. या योजनेंतर्गत देशात लाखो किमींचे रस्ते बांधण्यात आले आहेत. जी गावे आजपर्यंत रस्त्यांअभावी विकासापासून वंचित होती. त्या गावांमध्ये विकासाची पहाट दिसून येत आहे. या योजनेचे सकारात्मक परिणाम केंद्र शासनाला दिसून आल्यानेच त्यानंतरच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने सुद्धा सदर योजना त्याच नावाने सुरू केली आहे. सध्या या योजनेचा दहावा टप्पा सुरू आहे. योजनेच्या सुरूवातीपासून २००६ पर्यंत सदर योजना जिल्हा परिषदेच्या मार्फतीने राबविण्यात येत होती. त्यानंतर २००६-०७ मध्ये ग्रामीण रस्ते विकास संस्थेची स्थापना करून २००९ पासून स्वतंत्र कार्यकारी यंत्रणा निर्माण करण्यात आले. १० टप्प्यात २३३ कामे मंजूर करण्यात आली. त्यापैकी १८१ कामे पूर्ण झाली आहेत. ३८ कामे प्रगतिपथावर आहेत. या योजनेसाठी आजपर्यंत १९७ कोटी ७५ लाख रूपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत १,०७४.३२ किमीचे मार्ग मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ६९७.३७ किमीचे रस्ते बांधून पूर्ण झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग नक्षल प्रभावित व जंगलाने व्यापला आहे. त्याचबरोबर काही गावांची लोकसंख्या १०० पेक्षाही कमी असून दोन गावांमधील अंतर चार ते पाच किमीपेक्षाही जास्त आहे. कमी लोकसंख्येसाठी रस्ते तयार करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला आर्थिक अडचणी येत असल्याने सदर विभाग या गावांमध्ये रस्ते निर्माण करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा अनुभव आल्यानंतर सदर योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा संपूर्ण निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील शेकडो गावे रस्त्यांनी जोडली आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसातही मार्गक्रमण करण्यास सुकर झाला आहे. मात्र या रस्त्यांची आता बऱ्याच दिवसांपासून डागडुजी झाली नसल्याने सदर रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. (नगर प्रतिनिधी)