शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
5
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
6
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
7
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
8
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
9
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
10
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
11
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
12
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
13
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
14
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
15
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
16
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
17
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
18
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
19
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
20
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई

लग्नाच्या मेजवानीत सोन्याचा भात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 17:36 IST

भारतीय विवाह सोहळ्यात सोन्याची एक महत्वपूर्ण जागा आहे. परंतु, केवळ दागिने, भेटवस्तू यापुरतेच सोने आता मर्यादित राहिलेले नाही. तर हे सोने जाऊन पोहोचलेय थेट विवाहातील पंक्तींमध्ये. हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या एका विवाह समारंभात पाहुण्यांना चक्क सोन्याचा भात सर्व्ह करण्यात आला

ठळक मुद्दे* हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या एका विवाह समारंभात पाहुण्यांना चक्क सोन्याचा भात सर्व्ह करण्यात आला.* या सोन्याची भाताची कल्पना हैदराबादमधील प्रसिद्ध शेफ व्ही साई राधाक्रि ष्ण यांना सुचली.* भातावर सर्व्ह करण्यासाठी 24 कॅरट सोन्याचा वर्ख वापरण्यात आला. पानावर गरमगरम भात वाढला की लगेच हा वर्ख वाढला जात होता.

- सारिका पूरकर-गुजराथीभारतीय विवाह सोहळा म्हटला की भव्य मंडप सजावट, रोषणाई, संगीत मैफली, भरजरी कपड्यांचा थाट हे सगळे ओघानं आलंच. याव्यतिरिक्त भारतीय विवाह सोहळ्याचे आणखी एक कनेक्शन आहे, ते म्हणजे सोनं. सोने या मूल्यवान, प्रतिष्ठा वृंद्धिंगत करणा-या धातूशिवाय भारतीय विवाह सोहळा नक्कीच अपूर्ण राहील.डोक्यापासून पायापर्यंत नववधूला सोन्याच्या दागिन्यात मढवून तिचा सन्मान केला जातो. सोन्याचे दागिने म्हणजे तिच्यासाठी केवळ श्रुंगार राहात नाही तर अनेकांचे आशीर्वाद बनून जातात. कारण भारतात मुलीच्या मामांनी तिच्या लग्नात भाचीकरिता साड्या, दागिने भेट म्हणून देण्याची प्रथा आहे. मामा मोशावळा म्हणूनही या प्रथेस संबोधलं जातं. मामानं दिलेले हे सोन्याचे दागिने, साड्या लग्नमंडपात दिमाखात मिरवले जातात. सांगायचे तात्पर्य हेच की, भारतीय विवाह सोहळ्यात सोन्याची एक महत्वपूर्ण जागा आहे. परंतु, केवळ दागिने, भेटवस्तू यापुरतेच सोने आता मर्यादित राहिलेले नाहीये बरं का !!!होय, तर हे सोने जाऊन पोहोचलेय थेट विवाहातील पंक्तींमध्ये..हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या एका विवाह समारंभात पाहुण्यांना चक्क सोन्याचा भात सर्व्ह करण्यात आला.आत्ता बोला!विवाहासारखा मंगल सोहळा नेहमीच संस्मरणीय व्हावा, आलेले पाहुण्यांना साग्रसंगीत मेजवानी देता यावी याकरिता भारतात अनेक प्रयत्न केले जातात. असाच हा एक प्रयत्न होता. व्हॉट्स अ‍ॅप आणि अन्य सोशल मीडियावर या लग्नातील सोन्याच्या भाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. त्यामुळे हा सोन्याचा भात चर्चेचा विषय बनला आहे. नाव जरी सोेन्याचा भात असला तरी सोने टाकून तो शिजवलेला नाहीये. या व्हिडिओत असं दिसतंय की केळीच्या पानावर भात वाढल्यानंतर त्यावर वाढपी सोन्याचा वर्ख ठेवतोय. त्यावर मग रस्सम, सांबर ओतला जातोय.

 

शेफ साई यांची कल्पनाया सोन्याची भाताची कल्पना हैदराबादमधील प्रसिद्ध शेफ व्ही साई राधाक्रि ष्ण यांना सुचली. ते म्हणतात की, ‘या लग्नात काहीतरी वेगळं खानपान देण्याची इच्छा माझ्या क्लायंटनं व्यक्त केली होती. त्यामुळे काय करता येईल असा विचार केला असता ही कल्पना सुचली. आपल्याकडे एरवी आपण चांदीच्या वर्खात गुंडाळलेली मिठाई खातोच शिवाय सुवर्णप्राशन विधी देखील लहान मुलांसाठी करण्याची प्रथा आहेच. त्यातच मग थोडे नाविन्य आणण्याचा मी प्रयत्न केला.’भातावर 24 कॅरट सोन्याचा वर्खहैदराबादमधील या विवाह सोहळ्यात मेजवानीत भातावर सर्व्ह करण्यासाठी 24 कॅरट सोन्याचा वर्ख वापरण्यात आला. पानावर गरमगरम भात वाढला की लगेच हा वर्ख वाढला जात होता. जेणेकरु न सोने चटकन वितळून भातात एकजीव होऊन जाईल आणि सांभार घातल्यावर वर्खाचे तुकडे तोंडात येणार नाहीत. भातावर वाढण्यासाठी वापरलेल्या या सोन्याच्या एका पानाची किंमत होती 300 रूपये. हैदराबादमध्ये ही सोन्याची पानं सहज उपलब्ध आहेत, हे आणखी एक विशेष. शेफ साई असे हटके प्रयोग अनेक विवाह सोहळ्यांमध्ये करीत असतात. पण सोन्याच्या भाताचा हा अनोखा प्रयोग भारतात पहिल्यांदाच झालाय, हे मात्र नक्की.