"तू शेवटपर्यंत लढाऊ होतास - एक खरा योद्धा", विभू राघवच्या निधनानंतर सौम्या टंडनची भावनिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 10:29 IST2025-06-03T10:29:06+5:302025-06-03T10:29:39+5:30
Vibhu Raghav Passes Away: टेलिव्हिजन जगातमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. टीव्ही अभिनेता वैभव कुमार सिंग राघवेचं निधन झाले आहे.

"तू शेवटपर्यंत लढाऊ होतास - एक खरा योद्धा", विभू राघवच्या निधनानंतर सौम्या टंडनची भावनिक पोस्ट
Vibhu Raghav Death: टेलिव्हिजन जगातमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. टीव्ही अभिनेता वैभव कुमार सिंग राघवे (Vibhu Raghav) आता आपल्यात राहिला नाही. वैभवला चाहते विभू राघव या नावाने ओळखत होते. कोलन कॅन्सरशी (स्टेज 4) दीर्घ लढाईनंतर या अभिनेत्याचे निधन झाले. 'गुम है किसी के प्यार में' फेम कावेरी प्रियम आणि अभिनेता करणवीर मेहरा यांनी त्याच्या निधनाची पुष्टी केली आहे. त्याचे मित्र आणि सहकलाकार त्याच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. आज दुपारी १ वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान भाभीजी घर है फेम अभिनेत्री सौम्या टंडन (Saumya Tandon) हिने अभिनेत्याच्या निधनानंतर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
सौम्या टंडनने विभू राघवचे फोटो शेअर करत लिहिले की, माझा सुंदर मित्र विभू... आता देवदूतांसोबत आहे. काल रात्री आम्हाला सोडून गेला. विभू तू सुंदर होतास. आतून आणि बाहेरून. सगळं काही कोसळत असतानाही तू मला हसायला शिकवलंस. जग अंधारात असताना प्रकाश कसा धरायचा. तू शेवटपर्यंत लढाऊ होतास - एक खरा योद्धा. लोकांनी आशा सोडली तरीही तू पुढे जात राहिलास. तू कधीच थांबला नाहीस.
तिने पुढे लिहिले की, आपले प्लान्स होते, विभू. आम्हाला व्हिडिओ बनवायचे होते... तुला जे काही वाटत होते त्याबद्दल बोलण्यासाठी. आम्हाला वाटले की आमच्याकडे वेळ आहे. आम्ही थांबलो नाही. आणि आता माझ्याकडे फक्त तुझा आवाज, तुझे स्मित आणि तू मला दिलेले प्रेम उरले आहे. मला तुझी कायम आठवण येईल. आयुष्य खूप लहान आहे. मी ते तुझ्यासारखे जगण्याचा प्रयत्न करेन - पूर्णपणे, तीव्रतेने, मनाने. दररोज स्वतःचे सर्वोत्तम रूप बनण्यासाठी. माझा मित्र असल्याबद्दल धन्यवाद. प्रकाश, प्रेम, हास्य यासाठी धन्यवाद. आणि ज्यांनी योगदान दिले, प्रार्थना केली आणि विभूला लढण्याची संधी दिली त्या प्रत्येक व्यक्तीचे खरोखर आभार. मी तुम्हा सर्वांची सदैव आभारी आहे.