यामी गौतमच्या 'आर्टिकल 370' टीझरमध्ये दिसली मराठमोळ्या अभिनेत्याची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 12:42 PM2024-01-21T12:42:36+5:302024-01-21T13:01:22+5:30

'आर्टिकल 370' चित्रपटामध्ये झळकणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता

Yami Gautam, Priyamani & Vaibhav Tatwawadi to star in action-packed political drama 'Article 370' Teaser out | यामी गौतमच्या 'आर्टिकल 370' टीझरमध्ये दिसली मराठमोळ्या अभिनेत्याची झलक

यामी गौतमच्या 'आर्टिकल 370' टीझरमध्ये दिसली मराठमोळ्या अभिनेत्याची झलक

दहशतवादावर आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या 'आर्टिकल 370' या चित्रपटाचं टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरमध्ये यामी गौतम एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून दहशतवाद्यांशी लढताना दिसत आहे. हा सिनेमा आर्टिलक 370 (Article 370) म्हणजेच जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटवण्याच्या कथेवर आधारित आहे. विशेष म्हणजे या सिनेमात प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची एक झलक पाहायला मिळाली आहे. 

हा मराठी अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी.  'आर्टिकल 370' सिनेमात  वैभव तत्ववादीने लक्षवेधी भूमिका साकारली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वैभव मराठी कलाविश्वात सक्रिय आहेत. त्याने अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. वैभवसह या सिनेमात प्रियमणी, अरुण गोविल आणि राज अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

जिओ स्टुडिओने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर 'आर्टिकल 370'  चा टीझर शेअर केला आहे. 1 मिनिट 40 सेकंदांच्या टीझरमध्ये दमदार डायलॉग आणि अक्शन पाहायला मिळत आहे. यामीच्या पहिल्या झलकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा सिनेमा 23 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित या सिनेमाने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

यामीनं उरी: द सर्जिकल स्ट्राइक, बाला, विकी डोनर, काबिल आणि बदलापूर सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. तर 4 जून 2021 मध्ये तिने दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) सोबत लग्नगाठ बांधली. चंदीगढमध्येच अगदी साध्या पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ती लग्नबंधनात अडकली. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केलं. नुकतेच 'चोर निकल के भागा' आणि 'ओह माय गॉड 2'  या सिनेमांमध्ये यामी दिसली होती. 
 

Web Title: Yami Gautam, Priyamani & Vaibhav Tatwawadi to star in action-packed political drama 'Article 370' Teaser out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.