एक्स बॉयफ्रेंडबद्दल दीपिकाचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 10:44 IST2022-02-23T10:43:44+5:302022-02-23T10:44:14+5:30
Deepika Padukone old Interviews goes viral : रिलेशनशिप आणि एक्स बॉयफ्रेंडच्या फसवणुकीबद्दल अभिनेत्री दीपिका पादुकोणची एक जुनी मुलाखत चर्चेत आहे.

एक्स बॉयफ्रेंडबद्दल दीपिकाचा धक्कादायक खुलासा
रिलेशनशिप आणि एक्स बॉयफ्रेंडच्या फसवणुकीबद्दल अभिनेत्री दीपिका पादुकोणची एक जुनी मुलाखत चर्चेत आहे. दीपिकाने सांगितले, “माझ्यासाठी सेक्स म्हणजे फक्त शारीरिक संबंध नाही, तर त्यात भावनांचाही समावेश होतो. मी रिलेशनशिपमध्ये असताना त्याला कधीही फसवले नाही किंवा भरकटले नाही. जर मी एखाद्याला मूर्ख बनणार असेल, तर मी नातेसंबंधात का असेन? त्यापेक्षा अविवाहित राहणे आणि मजा करणे चांगले आहे."
"पण सगळ्यांनाच असं वाटत नाही. कदाचित म्हणूनच मी भूतकाळात दुखावले गेले. मी माझ्या बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडले होते आणि तरीही मी त्याला दुसरी संधी दिली. मीच मूर्ख होते. कारण तो माझ्याकडे भीक मागत होता. पण त्यानंतर मी त्याला रंगेहाथ पकडले. त्यातून बाहेर पडायला मला वेळ लागला.” असेही दीपिकाने सांगितले.
रणवीर सिंगपूर्वी दीपिका रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. तिने काही काळ विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या यालाही डेट केले.