'पंचायत ५' कधी येणार? वेबसीरिजच्या लेखकाने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "स्क्रिप्ट तयार असून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:33 IST2025-06-26T16:32:55+5:302025-06-26T16:33:38+5:30
'पंचायत ४'नंतर आता या वेबसीरिजच्या पुढील सीझनची अर्थात 'पंचायत ५'ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याविषयी सीरिजच्या लेखकाने महत्वाची अपडेट दिली आहे

'पंचायत ५' कधी येणार? वेबसीरिजच्या लेखकाने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "स्क्रिप्ट तयार असून..."
'पंचायत'या वेबसीरिजच्या चौथ्या सिझनच्या रिलीजनंतर चाहत्यांनी या सीरिजला खूप प्रेम दिलंय. काहींना चौथा सीझन आवडला. तर काहींना वेबसीरिज कंटाळवाणी वाटली. पण तरीही 'पंचायत' वेबसीरिजचे जे दर्दी चाहते आहेत त्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की, आता 'पंचायत ५' कधी येईल? कारण 'पंचायत ४'मध्येही कथा अर्धवट सुटली आहे. त्यामुळे 'पंचायत ५' येणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात पडला आहे. या प्रश्नाला सीरिजचा लेखक चंदन कुमारने उत्तर दिले आहे.
'पंचायत ५' लवकरच येणार?
'पंचायत' वेबसीरिजचा लेखक चंदन कुमारने अलीकडेच एका मुलाखतीत स्पष्ट केले की, "पंचायतच्या पुढच्या भागासाठी स्क्रिप्ट आणि दिग्दर्शनाची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. आम्ही नवनवीन सिझन बनवले, तितकी अपेक्षा वाढत गेली. त्यामुळे आव्हान वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी नवीन काही करण्याऐवजी मागील कथा पुढील कथेशी जोडली जावी, हाच त्यामागे उद्देश असतो. सीझन ४ चे भाग रिलीज होत असतानाच आम्ही सिझन ५ वर काम सुरू केला होतं. कारण चाहत्यांच्या अमाप प्रतिसादामुळे आम्हाला काम करण्यास उत्साह आला आहे."
अशाप्रकारे लेखकाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच सीझन ५ च्या शूटिंगला सुरुवात होऊन पुढील वर्षी याच जून-जुलै दरम्यान 'पंचायत ५' रिलीज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील सीझनमध्येही जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, सान्विका हे कलाकार मुख्य भूमिकेत असतील. चौथ्या सीझनच्या अखेरीस क्रांती देवी प्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्याने आता 'पंचायत ५'मध्ये पुढील कथा कशी रंगत निर्माण करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.