कॅन्सरचं निदान झाल्यावर हिना खानच्या हातून गेली वेबसीरिज, 'या' अभिनेत्रीने केलं रिप्लेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 17:33 IST2024-07-05T17:32:19+5:302024-07-05T17:33:01+5:30

हिनाच्या जागी आता कोणती अभिनेत्री भूमिका साकारणार याचाही खुलासा झाला आहे.

Hina Khan got replaced in her next web show Raapchik Reeta due to breast cancer | कॅन्सरचं निदान झाल्यावर हिना खानच्या हातून गेली वेबसीरिज, 'या' अभिनेत्रीने केलं रिप्लेस

कॅन्सरचं निदान झाल्यावर हिना खानच्या हातून गेली वेबसीरिज, 'या' अभिनेत्रीने केलं रिप्लेस

'ये रिश्ता क्या  कहलाता है' मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) बॉलिवूडमध्येही नाव कमावलं. काही दिवसांपूर्वीच हिनाने ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची धक्कादायक माहिती दिली. हिना सध्या कॅन्सरवर उपचार घेत असून तिला अभिनयातूनही ब्रेक घ्यावा लागला आहे. या कारणामुळे तिचा आगामी शो 'रापचिक रीटा' मधून हिनाला रिप्लेस करण्यात आलं आहे. हिनाच्या जागी आता कोणती अभिनेत्री भूमिका साकारणार याचाही खुलासा झाला आहे.

हिना खानला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. हिना तिचा हा प्रवास रेकॉर्ड करुन चाहत्यां सोशल मीडियावर दाखवत आहे. दोन दिवसांपूर्वी तिने केस गळण्याआधीच ते कापले याचा भावुक व्हिडिओ शेअर केला. यावेळी तिच्या आईलाही अश्रू अनावर झाले होते. हिनाचा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिला धीर दिला. दुसरीकडे हिना ज्या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारणार होती त्या 'रापचिक रीटा' मधून ती बाहेर पडली आहे. आता तिच्या जागी 'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्मा (Adah Sharma) ही भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे. 

'रापचीक रीटा' ही एका बिंधास्त महिला वकिलावर आधारित सीरिज आहे. यासाठी हिनाला फायनल करण्यात आले होते. मात्र कॅन्सरमुळे ती आता यात दिसणार नाही. डिझ्नी प्लस हॉटस्टारची ही सीरिज आहे. अदा शर्माने सीरिजला होकार दिला की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

Web Title: Hina Khan got replaced in her next web show Raapchik Reeta due to breast cancer