'क्रिमिनस जस्टिस ४'चे उर्वरीत भाग कधी रिलीज होणार? एका क्लिकवर जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:02 IST2025-06-04T16:00:15+5:302025-06-04T16:02:10+5:30

'क्रिमिनस जस्टिस ४'चे पहिले तीन भाग रिलीज झाले. उर्वरीत भाग कधी रिलीज होणार हे जाणून घेण्यासाठी बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या

Criminal Justice 4 remaining episode release date and time jio hotstar pankaj tripathi | 'क्रिमिनस जस्टिस ४'चे उर्वरीत भाग कधी रिलीज होणार? एका क्लिकवर जाणून घ्या

'क्रिमिनस जस्टिस ४'चे उर्वरीत भाग कधी रिलीज होणार? एका क्लिकवर जाणून घ्या

पंकज त्रिपाठी यांची प्रमुख भूमिकेत असलेला 'क्रिमिनल जस्टिस: अ फॅमिली मॅटर' या वेब सिरीजची सध्या चांगलीच चर्चा आहे. या वेबसीरिजने व्ह्यूअर्सचा टप्पा ओलांडला आहे. 'क्रिमिनस जस्टिस ४' (criminal justice 4) पाहणाऱ्यांची चांगलीच निराशा झाली कारण मेकर्सने हॉटस्टारवर वेबसीरिजचे फक्त तीन भाग रिलीज केले. त्यामुळे 'क्रिमिनस जस्टिस ४'चे उर्वरीत भाग कधी येणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर याचं उत्तर समोर आलंय.  जाणून घ्या

या दिवशी रिलीज होणार 'क्रिमिनस जस्टिस ४'चे उर्वरीत भाग

'क्रिमिनस जस्टिस ४' पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी. 'क्रिमिनस जस्टिस ४'चा पुढील अर्थात चौथा भाग ५ जून २०२५ रोजी रात्री १२ वाजता रिलीज होणार आहे. म्हणजेच आज ४ जून संपल्यावर ५ जून रोजी रात्री बरोबर १२ च्या ठोक्याला JioHotstar वर  'क्रिमिनस जस्टिस ४'चा पुढील भाग रिलीज होणार आहे.  'क्रिमिनस जस्टिस ४'चे एकूण ८ भाग असून दर गुरुवारी वेबसीरिजचा नवीन भाग ओटीटीवर रिलीज होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नवीन भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांना दर गुरुवारची वाट बघायला लागणार आहे.


 'क्रिमिनस जस्टिस ४' या सिजनमध्ये पंकज त्रिपाठी यांनी अ‍ॅडव्होकेट माधव मिश्रा यांची भूमिका साकारली आहे. या सिरीजमध्ये मोहम्मद झीशान अय्यूब, सुरवीन चावला, आशा नेगी, खूशबू आत्रे, मीता वशिष्ठ आणि श्वेता बासु प्रसाद यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. या सिरीजमध्ये कोर्टरूम ड्रामा, कौटुंबिक संघर्ष आणि गुन्हेगारी तपास यांचं उत्कृष्ट चित्रण पाहायला मिळतंय. ज्यामुळे ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'क्रिमिनल जस्टिस: अ फॅमिली मॅटर' ही सिरीज ८ भागांची असून, २९ मे २०२५ रोजी पहिल्या तीन भागांचे प्रीमियर झाले. उद्या चौथा भाग रिलीज होईल.

Web Title: Criminal Justice 4 remaining episode release date and time jio hotstar pankaj tripathi