अली फजलचा डॅशिंग अंदाज! पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत, 'ही' बॉलिवूड सुंदरी आहे सोबतीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 18:02 IST2025-08-18T17:56:35+5:302025-08-18T18:02:35+5:30
अली फजलचा डॅशिंग अंदाज! पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत,'ही' बॉलिवूड सुंदरी आहे सोबतीला

अली फजलचा डॅशिंग अंदाज! पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत, 'ही' बॉलिवूड सुंदरी आहे सोबतीला
Ali Fazal: अली फजल हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे. ज्याने केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपली छाप सोडली आहे. 'मिर्झापूर' सीरिजमुळे चर्चेत आलेला गुड्डू भैय्या म्हणजेच अभिनेता अली फजल सध्या हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच अॅमेझॉन प्राईमकडून नव्या सीरिजची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष अली फजलने वेधून घेतलं आहे. अली फजल या सीरीजमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
नुकतंच सोशल मीडियावर अली फजलच्या आगामी वेब सीरिजचं पहिलं पोस्टर समोर आलं आहे. राख या नव्याकोऱ्या सीरिजमधून हा अभिनेता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. 'राख'ही एक क्राईम थ्रिलर सीरिज आहे."राखेतून न्याय बाहेर येईल...", असं कॅप्शन देत निर्मात्यांनी याचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. दरम्यान,या पोस्टरमध्ये अली फजल एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळतोय. पोलिसांच्या गणवेशात अली फजल खूपच डॅशिंग दिसतोय. या पोस्टरमध्ये गाडीच्या नंबर प्लेटवर DLA 3609 लिहिले आहे, ज्यामुळे तो दिल्ली पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचं स्पष्ट होतंय.
दरम्यान, अली फजलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच तो अनुराग बसूंच्या 'मेट्रो इन दिनों' मध्ये दिसला. आता या सीरिजमध्ये अली फजलसोबत अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि आमिर बशीर देखील यात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. येत्या २०२६ मध्ये ही बहुचर्चित सीरिज ओटीटी प्लॅचफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.