Bigg boss marathi 3: आईला पाहताच विशाल भावूक; रडून रडून झाले बेहाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 15:24 IST2021-12-01T15:24:05+5:302021-12-01T15:24:47+5:30
Bigg boss marathi 3 : विशाल निकमची आई घरात येणार आहे. मात्र, त्यांच्या येण्यामुळे घरातील प्रत्येकाचे डोळे पाणवणार आहेत.

Bigg boss marathi 3: आईला पाहताच विशाल भावूक; रडून रडून झाले बेहाल
छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या बिग बॉस मराठीच्या घरात दररोज विविध टास्क, स्पर्धकांची भांडणं रंगत असतात. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून या घरात कोणताही वादविवाद होत नसून स्पर्धकांमध्ये भावूक वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या घरातील स्पर्धकांना त्यांची कुटुंबीय भेटायला येत आहेत. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर कुटुंबीयांना पाहून हे स्पर्धक भावूक झाले आहेत. यामध्येच आता विशाल निकमची आई घरात येणार आहे. मात्र, त्यांच्या येण्यामुळे घरातील प्रत्येकाचे डोळे पाणवणार आहेत.
बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे कुटुंबीय आल्यानंतर त्यांना फ्रीज करण्यात येतं आणि त्यानंतर रिलीज. मात्र, कुटुंबीयांना पाहिल्यानंतर या स्पर्धकांच्या भावनांचा बांध फुटतांना दिसत आहे. असंच काहीसं विशालच्या बाबतीत होणार आहे.
दरम्यान, आजच्या भागात विशालची आई बीबी हाऊसमध्ये येणार आहे. यावेळी त्याची आई विशालला काळजी घेण्यास सांगणार आहे. सोबतच तू छान खेळतोस असं कौतुकही करणार आहे. मात्र, विशालच्या आईच्या डोळ्यातलं पाणी पाहून घरातील अन्य स्पर्धकही भावूक होताना दिसणार आहेत.