ना खलनायक, ना अ‍ॅक्शन सीन्स! OTT वरील 'हा' रोमॅन्टिक सिनेमा अ‍ॅक्शनपटांवर पडतोय भारी, तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:41 IST2025-09-19T12:39:53+5:302025-09-19T12:41:39+5:30

चार जोडप्यांच्या नात्यातील गुंतागुंत! 'हा' रोमॅन्टिक सिनेमा ओटीटीवर आहे ट्रेंडिंग; तुम्ही पाहिला का?

aditya roy kapoor sara ali khan and panka tripathi starrer metro in dino movie trending on ott  | ना खलनायक, ना अ‍ॅक्शन सीन्स! OTT वरील 'हा' रोमॅन्टिक सिनेमा अ‍ॅक्शनपटांवर पडतोय भारी, तुम्ही पाहिला का?

ना खलनायक, ना अ‍ॅक्शन सीन्स! OTT वरील 'हा' रोमॅन्टिक सिनेमा अ‍ॅक्शनपटांवर पडतोय भारी, तुम्ही पाहिला का?

OTT Cinema: सध्या ओटीटीमुळे जगभरातील चित्रपट, मालिका आणि सीरिज प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येतात. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या पद्धतीचा कंटेट उपलब्ध असतो. एकीकडे ओटीटीवर क्राइम थ्रिलर, हॉरर आणि अॅक्शन पटांची चलती असताना एका रोमॅन्टिक चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. कोणातेही अॅक्शन सीन्स नाही शिवाय कोणताही खलनायकही नसताना हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंग आहे. या चित्रपटाचं नाव मेट्रो इन दिनों आहे. 

'मेट्रो इन दिनो' हा बॉलिवूडमधील रोमॅन्टिक चित्रपटांपैकी एक आहे. अनुराग बसु दिग्दर्शित बहुप्रतिक्षित 'मेट्रो इन दिनो' हा सिनेमा मुंबई शहरात आजूबाजूला घडणाऱ्या चार जोडप्यांची ही कहाणी आहे.४ जुलै रोजी हा चित्रपट रिलीज करण्यात आला. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. मात्र, ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर २ तास ४० मिनिटांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. २०२५ मधील हा म्युझिक रोमॅन्टिक ड्रामा प्रचंड चर्चेत आहे. 

'मेट्रो...इन दिनो' मध्ये चार जोडप्यांच्या नात्यातील गुंतागुंत दाखवण्यात आली आहे.
हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.'मेट्रो...इन दिनो' मध्ये आदित्य रॉय कपूर-सारा अली खान, अनुपम खेर-नीना गुप्ता, अली फजल-फातिमा सना शेख आणि पंकज त्रिपाठी-कोंकणा सेन शर्मा अशा इंटरेस्टिंग जोड्या आहेत

Web Title: aditya roy kapoor sara ali khan and panka tripathi starrer metro in dino movie trending on ott 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.